पुण्य वार्ता
मुख्य संपादक
८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने महिला सक्षमीकरणाची गरज महत्वाची असून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कल्पना आणि आदर्शांचे अनुकरण कृतीतून करत आहेत.
मोदी म्हणतात, महिला सक्षमीकरण नाही तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आहे. महिला सक्षमीकरणाचे मोदी नेहमीच समर्थक राहिले आहेत. महिला आरक्षण विधेयक पारीत करून महिलांचा सन्मान वाढवला आहे. ३३℅ आरक्षण देण्याच वचन पूर्ण केले.
मोदीजी नी जन धन खात्याच्या माध्यमातून व मुद्रा लोंन योजनेतून कोट्यवधी महिलांना आर्थिक सक्षम करून उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे तीन कोटींहून अधिक महिलांना धूरमुक्त जीवन जगण्याची कल्पना प्रत्यक्षात राबवली आहे. सहा कोटींहून अधिक शौचालये बांधली आहेत, ज्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर होतो. ते मोदींनी शक्य करून दाखवले आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत स्वच्छ शाळा अंतर्गत मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात आली, ज्यामुळे मुलींचे शाळाबाह्य प्रमाण कमी झाले.
भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा भाजपने प्रशासनात किंवा पक्ष संघटनेत महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचे समर्थन केले आहे. भारताच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महिला द्रौपदी मुर्म यांना बसवले आहे. निर्मला सीतारमण यांच्या रूपात एका महिलेला पूर्णवेळ संरक्षण मंत्री म्हणून पाहिले. नंतर अर्थमंत्री म्हणून काम दिले. मोदी सरकारमध्ये सहा महिला कॅबिनेट मंत्री आहेत. कदाचित मंत्रिमंडळात महिलांची संख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. पंचायतीपासून संसदेपर्यंत राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन मोदींनी अनेकदा केले आहे. ही पद्धत त्यांच्या आणि पक्षाच्या घरापासून सुरू होते हे स्पष्ट आहे. १७ व्या लोकसभेला आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला खासदारांचा बहुमान मिळाला आहे हे एक समाधानकारक सत्य आहे. लोकसभा खासदारांपैकी जवळजवळ निम्म्या महिला भाजपच्या आहेत.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यात भाजप नेहमीच विधिमंडळात महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास समर्थक राहिले आहे. अटलजी नी १९९८ ला हे विधेयक मांडले होते, परंतु इतर पक्षांच्या पाठिंब्याअभावी ते अयशस्वी झाले. पक्ष संघटने त महिलांसाठी ३३% जागा राखीव ठेवून भाजपने महिला प्रतिनिधित्व दिले आहे. प्रवक्त्यांमध्ये अनेक महिला आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्रजी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्याच चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली. ‘महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून, त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. शिवाय, शिक्षण, कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये १०० टक्के नोंदणी होईल आणि ती टिकून राहील, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याबरोबरच कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अतंर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना धोरणात करण्यात आली आहे.’
राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला १५००/- रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला व त्याची प्रभावी अंमलबजावणीही होत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करुन देण्याची महत्वाकांक्षी योजना आणली आहे. राज्यात मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे. नुकतेच राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षणासह खाजगी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये ५०७ अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप केवळ महिला-केंद्रित धोरणांन मुळे शहरे आणि गावांपासून ते संसदेपर्यंत देशाच्या विकासात महिलांची भूमिका वाढत आहे ही अभिमानाची बाब आहे. महिलांचा प्रशासनाचा केंद्रबिंदू बनवण्यातच नव्हे तर सत्तेच्या पदांवर चांगले प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यातही आघाडीवर आहे ही आणखी अभिमानाची बाब आहे.नवीन भारत म्हणजे महिलांना त्यांच्या जन्मजात नेतृत्वगुणांना व्यक्त करण्याची संधी देणे. उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता, संवाद कौशल्ये, बहुकार्य करण्याची क्षमता यासारख्या महिलांच्या गुणांचा फायदा राष्ट्राला होईल.
शब्दांकन
भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल, उत्तर नगर
