पुण्य वार्ता
ठाणे/ प्रतिनिधी/सण उत्सव एकत्र येण्याची संधी असते.. गणपती उत्सव काळात एक गाव एक गणपती ही संकल्पना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असून शहरी भागात देखील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक महिला एकत्र येतात विचारांची देवाण-घेवाण होते यामधूनच सर्वांची मने एकत्र होतात एकीचे बळ मिळते फळ ही संकल्पना राबवून लोकमान्य टिळकांनी गणपती बसून आपसातील वाद विवाद मिटवून गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याची संस्कृती जोपासली ही संस्कृती देशभरात नव्हे तर जगात अनेक ठिकाणी सुरू असल्याचे सध्या पहावयास मिळते . या काळात तरुण विविध उपक्रम राबवतात लेझीम यासारखे जुन्या खेळांना देखील तेवढेच महत्त्व दिसून येते.असे माळशेज
नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी काल…..ठाणे शहरातील नामांकित आरोग्य अधिकारी तथा शिर्डी संस्थानचे विश्वस्त राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे विश्वसनीय समर्थक डॉक्टर जालिंदर भोर यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे माळशेज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त तहसीलदार हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज् डुंबरे सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कानवडे. लेखापरीक्षा नरेंद्र सावंत आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर जालिंदर पवार यांनी सर्वांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला….. डुंबरे महाराज यांनी पुढे बोलताना सांगितले की कोकणात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव काळात सर्व नातेवाईक एकत्र येतात गौरी आपल्या भाऊरायाला भेटण्यासाठी येत असते हा उत्सव प्रत्येकाला दसरा दिपवाळी पेक्षा देखील मोठा असतो यामुळे प्रत्येकाचे मन एकत्रित होऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळतो एकमेकांच्या सुखदुःखात जाण्याचा योग येतो हाच संकल्प दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरोघरी गणरायाचे आगमन होते व गौरीचे देखील आगमन होते अनेक मान्यवर गणरायाचे व गौरीचे दर्शन घेण्यासाठी येतात या दहा दिवसाच्या काळामध्ये जो आनंद प्रत्येकाला मिळतो तो आनंद या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे प्रत्येकाने मनी धरले पाहिजे
. डीजे व फटाके गुलाल याची उधळण न करता शांतमय पद्धतीने बाप्पांना निरोप द्यावा गणेश मूर्तीचे विसर्जन न करता त्या एकत्र करून महानगरपालिका ग्रामपंचायत महाविद्यालय यांनी त्याचे विसर्जन करावे या काळामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडतात त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागते त्यामुळे सर्वांनी पोलीस यंत्रणेने दिलेले नियम पाळावे रात्रीच्या वेळी 11 नंतर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची दखल देखील घ्यावी नामवंत कीर्तनकार ह भ प डुंबरे महाराजांनी व्यक्त केले.

