पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आज दि. 12 गुरुवार रोजी शिर्डी येथील निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन खा. वाकचौरे यांच्या निवासस्थान असलेल्या ठिकाणी करण्यात आले होते.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील व तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी, मतदारसंघातील दर सोमवार मंगळवार सकाळी 10ते 1 वाजेपर्यंत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत असते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील
राहता, कोपरगाव श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर व अकोले या ठिकाणी देखील प्रत्येक तालुक्यात खासदार वाकचौरे यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून जनतेसाठी कायम सामाजिक,धार्मिक अध्यात्मिक, शैक्षणिक राजकीय क्षेत्रात सर्व समस्यांचे निराकरण कसे होईल याकडे प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे जनतेशी थेट संवाद व्हावा यासाठी खा.वाकचौरे यांनी जनतेच्या हितासाठी जनता दरबार भरवण्यात येत आहे.
आपला माणूस आपल्यासाठी हे ध्यय घेऊन कामाची सुरवात खा. वाकचौरे यांनी केली आहे.
गावोगावी विविध विकास कामांची निवेदने स्वीकारून प्रत्येकाच्या सुखदुःखात व सामाजिक कामात एक क्षणही विलंब न करता सातत्याने काम करणारे खा. म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघात ओळख आहे.
शिर्डी मतदारसंघातील कामे ही तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून विविध विकास कामाची मागणी करून पूर्णत्वास नेऊ असे खा. वाकचौरे यांनी या वेळेस जनता दरबारात आश्वासित केले केले.

