पुन्य वार्ता
महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या वतीने बाष्पके संचालनालयाचे संचालक व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार.
बाष्पके संचालनालय मुंबई: बॉयलर इंडिया २०२४ वा शानदार समारोप २७ सप्टेंबर २०२४ ला संपन्न झाला, बॉयलर इंडिया २०२४ चे आयोजन, नियोजन व विविध विषय कौशल्य पूर्वक हाताळून बॉयलर निगडीत व्यक्तींना बहुमुल्य मार्गदर्शन व ज्ञान दिले.या साठी मानावे तेवढे आभार कमीच आहेत. महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या बतीने बाष्पके संचालनालयाचे संचालक मा.श्री.धवल अंतापूरकर साहेब व बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक मा.श्री.वानखेडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉगरल इंडिया २०२४ प्रदर्शन,चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन
२५ सप्टेंबर २०२४ रोजी
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले.
वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस बॉयलर इंडिया २०२४ प्रदर्शन, चर्चासत्र भरविण्यात आले आहे. यावेळी मुंबई नौदल प्रकल्पचे महासंचालक व्हाइस ॲडमिरल आर स्वामीनाथन, कामगार आयुक्त डॉ. एच पी तुम्मोड, केंद्रीय बाष्पके मंडळ नवी दिल्लीचे तांत्रिक सल्लागार संदीप स. कुंभार, आय सी टी मुंबईचे प्राध्यापक जी. डी. यादव, फोर्ब्स मार्शलचे संचालक आणि मुख्य ऑपरेशन अधिकारी दत्ता कुवळेकर, ऑर्गेन्जबीक टेक्नॉजीज प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन, बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
२७ सप्टेंबरपर्यंत चालणार प्रदर्शन
बाष्पके क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचे कार्यशाळेत मार्गदर्शन
प्रदर्शनात २६० हून अधिक उद्योजकांचा समावेश
नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रदर्शनात समावेश
या प्रदर्शनात इटली, युके, जर्मनी, चीन, स्वीडन, बेल्जीयम, नेदरलँड या देशासह सुमारे २६० उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ( BMMS ) या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. BMMS प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पक व त्याच्या सुट्या भागाच्या निर्मितीची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. BMMS सॉफ्टवेअरच्या मदतीने आता उत्पादनातील प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवर सहजपणे करण्यात येईल, ज्यामुळे उत्पादक आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक चांगला होईल. BMMS सॉफ्टवेअरमुळे बॉयलर निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि संबंधित कागदपत्रांमध्ये सुलभता येईल. हे सॉफ्टवेअर केवळ औद्योगिक कार्यक्षमता वाढवणार नाही, तर कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल.
या प्रदर्शनात बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य मांडण्यात आली आहेत. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र व प्रदर्शन कामगार सुरक्षेला प्रोत्साहन देणारे आहे व बाष्पकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे.
बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा, बाष्पक, हीट एक्सचेन्जर, प्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामांतून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे.
उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभता, कामगारांची सुरक्षितता व कामगार हित या त्रिसूत्रीची अमंलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग व कामगार विभाग हे एकत्र काम करत आहेत. बॉयलर हा सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे.
प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रदर्शन व चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. श्री. अंतापूरकर यांनी प्रास्ताविकात बाष्पके संचालनालयाची माहिती व चर्चासत्राविषयी माहिती दिली. यावेळी उद्योग प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर बाष्पके उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते..
उद्योग क्षेत्रातील किरकोळ विक्रेते, व्यावसायिक,अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्यासंख्येत उपस्थित होते या आनंदमय वातावरणांत कार्यक्रम संपन्न झाला.

