पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या वतीने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
6जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व ग्रामीण व शहरी संघटनातील पत्रकारांना संवाद मिळावा व स्नेहभेट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार गुच्छ देऊन अभिवादन करण्यात आले. यानंतर पत्रकार संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांसाठी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले पत्रकार भवन बांधण्यासाठी तातडीने दहा लाख रुपयांचा आमदार निधी देण्याचे आश्वासन विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारांच्या मागणीनंतर जागा उपलब्ध झाल्यास तातडीने पत्रकारभावनासाठी दहा लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळे यांनी लक्षवेधी प्रश्न विचारत निळवंडे कालव्याच्या पाट चारी व पोटचारीचा प्रश्न मांडत निळवंडे उजव्या कालव्याचे काँक्रिटीकरण चालू असून, लाभार्थी क्षेत्रामधून जाणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. या भागातील लाभार्थी गावे व शेतकरी हे पाठ पाण्यावाचून वंचित राहतील, यासाठी तातडीने पोट चाऱ्या कधी होणार या प्रश्नावर लक्ष वेधले. आमदार अमोल खताळ यांनी तातडीने येत्या चार दिवसात पाट बंधारे विभागाची बैठक घेऊन वंचित गावे व शेतकरी यांना पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना पोटचाऱ्या तातडीने काढण्यात येतील या साठी येत्या चार-पाच दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यानंतर भारत रेघाटे, राजाभाऊ वराट, व इतर पत्रकारांनी तालुक्यातील व शहरातील प्रश्न मांडून शहरातील अतिक्रमण या विषयावर चर्चा करण्यात आली व तातडीने पत्रकारनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे आमदार खताळ सांगितले.
याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांचा डायरी पेन देऊन सत्कार करण्यात आला. व सर्व पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
