पुन्य वार्ता
अकोले || प्रतिनिधी || तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खा लोखंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोले तालुक्यामध्ये बिगर मोसमी मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुळा प्रवरा व आढळा तसेच आदिवासी भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. वादळ, वाऱ्या मुळे शेड, घरांचे नुकसान झाले आहे. पिंपळदरी, चास, लिंगदेव, लहीत, खडकी, शिसवद वांजुळशेत, शेलद या भागात शेतीचे नुकसान झाले असून कांदा पिकाचे ही अतोनात नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजरी च पण नुकसान झाले आहे. शेतात उभा असणारा भाजीपाला पिके सडली आहेत. टोमॅटो, फ्लावर, कोबी पिके वाया गेली असून, कोथांबीर पिक ही सडले आहे. कळस येथे झाड पडून शेतकरी दगावला आहे. पिंपळदरी येथे कुकूटपालन शेड चे पडली असून कोंबड्यांची पिले मेली आहे. या सर्वांचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी असे ही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना देण्यात आलेले आहे

