पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळच्या साथ रोगाने रुग्णांची यसंख्या वाढली आहे.दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
यासर्व पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी राजूर येथील सरकारी रुग्णालयात जावून रुग्णाची तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहीती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. व रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली.जिल्हा परिषदेच्या शाळे मध्येही उपचारांच्या सुरू असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचेशी देखील संपर्क साधला.
यावेळी राजूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ,ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून उपाय योजनांच्या संदर्भात सर्व सूचना दिल्या.यामध्ये निष्काळजीपणा दाखविण्यार्याची चौकशी करणयाचे निर्देश जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
यावेळी
डॉ.अजित नवले , मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले सदाशिव साबळे, संतोष मूर्तडक,महेंद्र सोनवणे,नवनाथ शेटे, अमोल बोऱ्हाडे
यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


