पुण्य वार्ता
लिंगदेव (प्रतिनिधी ) – अकोले तालुक्यातील लिंगदेव गाव हे महत्वपूर्ण गाव मानले जाते या गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर गावा पेक्षा या गावाला आगळी वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे या गावात स्वयंभू लिंगेश्वराचे मंदिर आहे. या गावात दरवर्षी गुढीपाडव्याला मोठी आखाडी यात्रा भरत असते .ही यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून या यात्रेमुळे लिंगदेव गावचे नाव महाराष्ट्रात व देशात तसे विदेशातही गेलेले आहे. लिंगदेव गावामध्ये २ हायस्कूल १ जुनियर कॉलेज व ३ प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या रस्त्यावरच अवैद्य दारू विक्रेत्यांचे अड्डे आहेत . यामुळे दारू पिणारे तरुण व्यसनाधीन झालेले निदर्शनास आले तसेच शाळकरी मुलांनाही खूप त्रास होत आहे त्यामुळे आज अवैद्य दारू विक्री ही बंद झालीच पाहिजे असा पवित्रा घेतला.
लिंगदेव हे गाव साधारण सहा हजार लोकसंख्येचे गाव असल्याने या गावात उत्तम असे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आहे या गावातील बहुतेक तरुण हे देश सेवेसाठी शासकीय सेवेत आहे .हे गाव मुळा नदीच्या किनारी वसलेले असल्याने पूर्णता बागायत क्षेत्र असल्याने गाव सुजलाम सुफलाम आहे.श्रावण महिना चालू असल्याने या गावात भगवान लिंगेश्वराच्या पावनभूमीत मोठे उत्सव साजरे केले जातात चौथ्या श्रावणी सोमवारी निमित्ताने हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन झाले. त्याचप्रमाणे या गावाला अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या माध्यमातून ११ कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे.
१५ ऑगस्ट निमित्ताने आज भगवान लिंगेश्वराच्या सभामंडपामध्ये ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होत असताना ऐनवेळेस येणाऱ्या विषयांमध्ये गाजलेला प्रश्न म्हणजे लिंगदेव गावात चालू असणारी अवैद्य दारू विक्री जर आपण भगवान लिंगेश्वराची श्रावण महिन्यात तन-मन धनाने रोज भगवान लिंगेश्वरांच्या पिंडीवर रोज बेल पत्र वाहून पूजा करत असतो. त्याचप्रमाणे दिवसभरात भावीभक्त मोठ्या श्रध्देने दर्शन घेत असतात काही भाविक आपला नवस फेडण्यासाठी सत्यनारायण महापूजा घालत असतात अशातच काही लोक अवैद्य दारू विक्री करून गावातील वातावरण दूषित करण्याचे ही काम करत असतात त्यावर गेली १५ ते २०वर्षापासून गाजत असलेला विषय म्हणजे दारूबंदी यावर कोणताही ठोस निर्णय होत नव्हता मात्र १५ ऑगस्ट ची विशेष ग्रामसभा घेत या ग्रामसभेमध्ये सरपंच अमित घोमल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असणारी ग्रामसभा महत्वपूर्ण ठरली यामध्ये गावचे प्रमुख कार्यकर्ते यांनी या विषयाला हात घालून कोणत्याही परिस्थितीमध्ये लिंगदेव गावात चालू असणारी अवैद्य दारू विक्री ही बंदच झाली पाहिजे असा ठराव यावेळी पारित करत दारूबंदी समितीच स्थापन करण्यात आली .
या समितीच्या अध्यक्षस्थानी कामधेनु कृषी सेवा केंद्राचे प्रमुख जालिंदर महादू कानवडे यांची निवड करण्यात आली तर शेतकरी पुत्र शैलेश कानवडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर या समितीमध्ये गणेश कानवडे ,लिंगदेव ग्रामपंचायत सदस्या कल्पना फापाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे, ऋषी कानवडे , पत्रकार शुभम फापाळे,रोहिणी हाडवळे, वामन कोरडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली यावेळी जी गाडी गावात दारू घेऊन येत असेल त्या गाडीचा बंदोबस्त करून कोणत्याही प्रकारे गावात अवैद्य दारू विक्री होणार नाही याची ग्वाही अध्यक्ष जालिंदर कानवडे तर उपाध्यक्ष शैलेश कानवडे यांनी दिली त्याचप्रमाणे लिंगदेव गावचे सरपंच अमित घोमल यांनी खेद व्यक्त करत मी गेली प१५ वर्षापासून प्रयत्न करत असून त्याला कधी यश आले नाही. मात्र माझ्याच कार्य काळामध्ये आपण सर्वांनी मला या महत्त्वाच्या विषयाला निर्णय घेण्यास भाग पाडले याचा मला मनस्वी आनंद होत आहे.तसेच ग्रामपंचायत कडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल व गावातील तरुण व ग्रामस्थ व्यसनाधीन होणार नाही याची काळजी आपण घेऊ या साठी सर्व प्रकारचे सहकार्य ग्रामपंचायत कडून केले जाईल. अशी ग्वाही सरपंच अमित घोमल यांनी दिली यावेळी सर्वांनी ग्रामपंचायत उपस्थित सदस्यांचे आभार मानले.
यावेळी लिंगदेव गावचे माजी उपसरपंच अरुण फापाळे तंटामुक्ती अध्यक्ष लहानु फापाळे लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त रामकृष्ण कानवडे निवृत्ती अमरे उपसरपंच प्रमिला कानवडे राहुल कोरडे विक्रम पवार शरद पवार लिंगेश्वर वाचनालय अध्यक्ष सदाशिव कानवडे पोलीस पाटील गणेश पवार महेश फापाळे कृषी अधिकारी नरेंद्र रामोळे साहेब एकनाथ कोरडे विठ्ठल कानडे आनंदा कातोरे गोविंद कातोरे यमन कानवडे अशोक कोरडे शशिकांत फापाळे ग्रामपंचायत सदस्य बजरंग ढोकरे माजी उपसरपंच चेतन आढाव ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पावसे व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

