पुन्य वार्ता
अकोले(प्रतिनीधी)-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ विद्यालय चास येथील गरजू विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप करण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेते ते एका दैनिकाचे संपादक असा दैदिप्यमान प्रवास असणारे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या सुख दुःखात सहभागी होणारे , शासन पातळीवर पत्रकारांचे प्रश्न सोडवून घेणारे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नववर्षानिमित्त अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित चास येथील भैरवनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

डॉ.आरोटे यांना चास ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून त्यांनी दिलेल्या वह्यांचे वाटप चास च्या सरपंच सौ सुरेखाताई शेळके, उपसरपंच सचिन शेळके, रामदास शेळके,सेवानिवृत्त शिक्षक कारभारी शेळके गुरुजी , प्राचार्य सुनील चौधरी,रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य आदींच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य सुनील चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन भारत शेळके यांनी केले तर आभार गोपीचंद लेंडे यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

