पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोटरी क्लब अकोले सेंट्रल या संस्थेस “आदर्श सामाजिक संस्था ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आ.डॉ.किरण लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्त आ.डॉ.किरण लहामटे मित्र मंडळ व व्हाईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोले महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अगस्ति साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पा.गायकर होते.यावेळी पदमश्री राहीबाई पोपरे,आ.डॉ.
किरण लहामटे,अक्षय आभाळे, संदीप दातखिळे आदीसह अनेक मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाहीर रामानंद उगले यांच्या ” महाराष्ट्राची लोकगाणी” या कार्यक्रमाने अकोलेकरांना मंत्रमुग्ध केले,अकोले करांनीही त्यास मनमुराद दाद दिली.या कार्यक्रमाने सर्व सोहळ्यास रंगत आणली.
यावेळी आ.डॉ.किरण लहामटे यांचा वाढदिवस केक कापून व अनेक संस्थांनी व वैयक्तिक सत्कार करून मोठ्या उत्साहात साजरा झाला.
रोटरी क्लब हा गेल्या ७ वर्षांपासून तालुक्यात विविध क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान देत आहे.या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून तालुक्यातील जडणघडणीत मोलाचा वाटा उचलीत असल्याबद्दल हा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार देऊन रोटरी क्लब ला सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, खजिनदार संदीप मोरे,माजी अध्यक्ष अमोल वैद्य, सचिन आवारी,डॉ रवींद्र डावरे,सुनील नवले, सदस्य भारत पिंगळे,उमेश साबळे,विजय पावसे आदींनी स्वीकारला.
चौकट- यावेळी विविध स्तरातील मान्यवरांना व संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये अशोक राव देशमुख ( सहकार भूषण),महेंद्र वाकचौरे( उत्कृष्ट प्रशासकीय सेवा),कै.भास्करराव कदम गुरुजी( मरणोत्तर – शैक्षणिक सेवा), डी. बी.फापाळे( आदर्श देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष), सुनील नवले( आदर्श कृषी सेवा ),सचिन आवारी( आदर्श आरोग्य सेवा), नवनाथ शेटे( आदर्श नगरसेवक),कोंडीराम चौधरी( आदर्श सरपंच),
सतीश चोथवे( आदर्श उद्योजक),भगवंत वैद्य( आदर्श कृषी भूषण), डॉ.विशाल देशमुख( आदर्श पशु वैद्यकीय सेवा)मिलिंद नाईकवाडी( आदर्श दूध उत्पादक)फिजा सय्यद( उत्कृष्ट खेळाडू),विक्रम गायकर( आदर्श शिक्षक),संतोष बोटे( आदर्श युवा सरपंच), लक्ष्मण घोलप( संत सेवा पुरस्कार)विकास कोटकर( आदर्श प्रिंट मीडिया उद्योजक) संदीप दातखिळे( आदर्श पत्रकार) विठ्ठल पंत नामदेव गोर्डे महाराज( वारकरी भूषण) नारायण जगधने( आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष),प्रशांत देशमुख( आदर्श ग्रामपंचायत सदस्य),डॉ,रामदास खामकर(बेस्ट ए आय टेक्निशियन) रोटरी क्लब अकोले सेंट्रल(आदर्श सामाजिक संस्था) याशिवाय एमपीएससी/ यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी)
