पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील ना. बाळासाहेब थोरात सहकारी दूध संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त दूध उत्पादक सभासदांना रेबिट अनामत व तेल व साखरेचे वाटप करण्यात आले.
थोरात संस्थेच्या वतीने सभासदांना 3 रुपये अनामत,2 रुपये संस्थेच्या वतीने देण्यात आले व दूध संघाच्या वतीने 1 रु.रिबीट एकूण दूध उत्पादक सभासदांना 6 रुपये रिबिट व अनामतीची वाटप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन अड. माधवराव कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले संस्थेचे व्हा. चेअरमन विलास कानवडे यांच्या हस्ते व पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सूर्यभान कानवडे यांच्या उपस्थितीत सर्व दूध उत्पादकांना रिबेट व अनामत सह दीपावली निमित्त तेल डब्बा व साखरेचे देखील वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेची ज्येष्ठ सदस्य रघुनाथ नाना कानवडे, सचिव दादाभाऊ फरगडे , दत्त पतसंस्थेचे व्हॉ. चेअरमन सोमनाथ कानवडे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब फरगडे, संभाजी कानवडे, संपत कानवडे,आदींसह दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

