पुन्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे
6 जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, संगमनेर शाखेच्या वतीने पत्रकार दिन मोठा उत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी 10 वाजता सर्व शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे सर्व पत्रकारांच्या उपस्थित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हार पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे यांनी येणाऱ्या काळात सर्व संघटनेतील पत्रकारानी एकत्र येऊन काम करण्याचे आव्हान केले.व आचार्य बाळशास्त्री जांभेकर जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पत्रकारांनी एकत्रित काम केल्यास संघटना भक्कम पणाने उभ्या राहतील यासाठी काम करावे असे आव्हान त्यांनी केले. यानंतर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकारांनी आव्हानांना सामोरे जात संघटनात्मक काम करावे व पत्रकारानी एकत्रित राहून काम करावे असे सांगितले.दैनिक नायक चे संपादक श्याम तिवारी, मंगेश सालपे आदींची भाषणे होऊन सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व पत्रकार बांधवांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष संजय गोपाळे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने, शाम तिवारी, मंगेश सालपे, संदीप वाकचौरे, यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष, सोमनाथ काळे, ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने, सचिव अमोल मतकर, संजय नवले,नायकचे संपादक शाम तिवारी, मंगेश सालपे, सुशांत पावसे, शेखर पानसरे,बाळासाहेब गडाख, भारत रेघाटे, भारत पडवळ, गोरक्षनाथ नेहे, सतीश आहेर, बाबासाहेब कडू, सुभाष भालेराव, महेश पगारे, दत्ता घोलप, नीलिमा घाडगे, अण्णासाहेब काळे, चंद्रकांत शिंदे,राजू नरवडे, सुखदेव गाडेकर, संजय अहिरे,डोंगरे, इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप वाकचौरे यांनी केले.

