पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
५२ वे अकोले तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन दिनांक २ जानेवारी २०२५ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कळस बुद्रुक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या शुभहस्ते व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री अमित भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी वैभवराव पिचड यांनी विद्यार्थ्यांच्या मनात गणित विज्ञानातील संकल्पना रुजवणे, ग्रामीण भागात संशोधक, शास्त्रज्ञ घडवण्याचे काम होते शास्त्र व अध्यात्म हे प्रगत असेल तर देशाचे भवितव्य घडवणाऱ्या पिढ्या निर्माण होतील असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अमित भांगरे म्हणाले की सध्याचे युग हे रोबोटिक्स, ए.आय. इनोव्हेशनचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे एडिसन सारखं अनेक प्रयोग सफल झाले तरीही त्याचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत असे सांगितले. या प्रदर्शनात एकूण १३५ शाळांतील ३७० प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर अर्थ बांधकाम समिती अहिल्यानगर चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, कळस बुद्रुकचे सरपंच राजेंद्र गवांदे, सिताराम वाकचौरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे, ज्ञानदेव वाकचौरे, निवृत्ती मोहिते, राहुल शेटे, नामदेव निसाळ, राजेंद्र डावरे, अक्षय भोर संजय वाकचौरे, सचिन वाकचौरे, धनंजय भांगरे, भास्करराव कानवडे, सतीश काळे, विजय भालेराव सचिन वाकचौरे, श्याम मालुंजकर, विनोद नवले, गणेश रेवगडे, अरविंद कुमावत, बाळासाहेब दोरगे, संभाजी झावरे, अनिल गायकवाड, बाळासाहेब आरोटे, शकील बागवान, तानाजी वाजे, माधवराव हासे स्मिता अडाणी, सविता कचरे आदी मान्यवर उपस्थित होते,
तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात विज्ञान विभागात लहान व मोठ्या गटात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्हा अध्यापक संघाची माजी अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्या वतीने प्रत्येकी १००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या बक्षीस वितरण समारंभात यावर्षीपासून शैक्षणिक वर्षात निवृत्त होणाऱ्या विज्ञान गणित शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला. त्याचबरोबर यावर्षीचा मानाचा फिरता करंडक हा श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय राजुर व आढळा विद्यालय देवठाण यांना विभागून देण्यात आला. सर्व विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे अकोले तालुक्यातील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल वीरगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
निवड प्राप्त विद्यार्थ्यांची यादी – खुलागट इयत्ता चौथी व पाचवी- प्रथम क्रमांक सत्यम बाळासाहेब जाधव (जि.प.प्राथ.शाळा नवलेवाडी ) उपकरणाचे नाव सौर ऊर्जा स्वयंचलित जलसिंचन यंत्रणा. द्वितीय क्रमांक अश्व बाबासाहेब गीते ( मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल कोतुळ ) उपकरणाचे नाव इलेक्ट्रॉनिक गेम उपकरण. तृतीय क्रमांक आराध्या प्रदीप घोडे, (जि.प.प्राथ.शाळा कोतुळ ) उपकरण प्रदूषण नियंत्रण नियंत्रण.
विज्ञान विभाग इ. सहावी ते आठवी प्रथम क्रमांक ऋषभ प्रवीण आहेर ( धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल विरगाव) वायु प्रदूषण सर्वक्षक व कार्बन शुद्धीकरण. द्वितीय क्रमांक परि मच्छिंद्र महाडदेव ( जि. प. प्राथ. शाळा धामणगाव आवारी ) वाहन अपघात प्रतिबंधक तृतीय क्रमांक कावेरी राजेंद्र खताळ ( जि. प. प्राथ. शाळा कळस बु.) उपकरण मानव संसाधन उपयोजन. दिव्यांग गटात सिद्धेश संतोष हांगेकर ( श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर) बहुउद्देशीय व्हीलचेयर.
विज्ञान विभाग इ. नववी ते बारावी प्रथम क्रमांक सिद्धार्थ मच्छिंद्र देशमुख ( श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय राजुर) समर्थ वॉटर टँक क्लिनर. द्वितीय क्रमांक सच्चिदानंद संदीप गोडसे (आदर्श माध्यमिक विद्यालय ललित खुर्द ) बहुउद्देशीय विद्युत सायकल. तृतीय क्रमांक संचिता मंगेश गायकर ( सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा) वाहनातील धुरापासून शाई निर्मिती. दिव्यांग गटात प्रकाश अशोक पथवे (आढळा विद्यालय देवठाण) बायोगॅस डिझेल.
गणित विभाग इयत्ता सहावी ते आठवी प्रथम क्रमांक सानवी सचिन जगताप ( जि. प. प्राथ. शाळा सावरगाव पाट) गणितीय चौरस द्वितीय क्रमांक हांडे अलिशा संपत ( जि. प. प्राथ. शाळा मन्याळे ) क्लीनोमीटर तृतीय क्रमांक धृती रमेश देशमुख (परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल अकोले ) पायथागोरसचे प्रमेय. दिव्यांग गटात अनुजा बाळू पराड ( आढळा विद्यालय देवठाण ) गणितीय प्रतिकृती.
गणित विभाग उच्च माध्यमिक इयत्ता नववी ते बारावी प्रथम क्रमांक मानसी काकासाहेब देशमुख ( कन्या विद्यामंदिर अकोले ) त्रिकोणमितीचे उपयोग. द्वितीय क्रमांक श्रद्धा महेश पंडित (अगस्ती विद्यालय अकोले) त्रिकोणमिती. तृतीय क्रमांक करण हनुमंत पडवळे (मुळा माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खांड) दोन क्रमवार सम किंवा विषम संख्यांचा गुणाकार.
शिक्षक गटात शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक प्रथम क्रमांक श्री बाळासाहेब श्रीरंग आरोटे ( जि.प. प्राथ. शाळा मुक्ताईची वाडी) कृतीयुक्त शिक्षण. द्वितीय क्रमांक श्रीमती अनिता अनिल चावडे (न्यू इंग्लिश स्कूल निम्रळ ) शैक्षणिक साहित्य. तृतीय क्रमांक श्रीमती स्मिता सुधाकर धनवटे ( जि.प. प्राथ.शाळा ठाकरवाडी विठे) घेऊ स्पर्षाचे ज्ञान राहू अन्यायापासून लांब.
शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक श्री जगन्नाथ एकनाथ जाधव (शासकीय आदर्श आश्रमशाळा मवेशी) टाकाऊ वस्तु पासून शैक्षणिक साहित्य. द्वितीय क्रमांक श्री मंगेश कारभारी वाघ ( शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा केळी रुमणवाडी) द्रवरूप पदार्थाचे गुणधर्म. तृतीय क्रमांक श्री अमोल गौरव कासार ( शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रतनवाडी ) न्यूटनचे गतीविषयक नियमांचा अभ्यास.
प्रयोगशाळा परिचर गट प्रथम क्रमांक श्री अनिकेत संजय गावडे (श्री लिंगेश्वर हायस्कूल लिंगदेव) जलशुद्धीकरण यंत्र. द्वितीय क्रमांक श्री वैभव सुनील वालझाडे (कळसुबाई माध्यमिक विद्यालय बारी) हातपंप. तृतीय क्रमांक श्री सुदामा अंबादास बटवाल (संत ज्ञानेश्वर विद्यालय शिळवंडी) मोबाईल दुरुपयोग.
