पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
दादर येथील फुलांच्या वाहनांना पार्किंग मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू व ग्रामीण भागातील युवकांना व्यवसायात येण्यासाठी शासनामार्फत प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन आ.डॉ.किरण लहामटे यांनी केले.
तालुक्याचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी रुंभोडी येथील यशस्वी उद्योजक तथा फुलांचे व्यापारी,महाराष्ट्र राज्य फुल असोसिएशनचे कार्याध्यक्ष संदीप मालुंजकर यांच्या ऑफिसला सदिच्छा भेट देऊन फुलांच्या मार्केट माहिती घेतली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य फुल असोसिएशनचे कार्याध्यक्ष संदीप मालुंजकर यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.यावेळी त्यांच्या समवेत विनय सावंत,चंद्रभान भोत,बाळासाहेब वाळुंज हे उपस्थित होते.
यावेळी आ.लहामटे यांनी व्यवसायाची माहिती घेत व्यवसायात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.यावेळी संदीप मालुंजकर यांनी दादर येथे ट्रान्सपोर्टची वाहने गेली असता त्यांना पार्किंग ची अडचणी येतात.सकाळ
पासून वाहनाकडून एका तासाचे 500 ते 1000 रुपये दंड पोलिस घेतात .पोलिस यंत्रणा त्रास देते असे अनेक अडचणी सांगत फुलांचा व्यापार कशा पद्धतीने चालतो,याची माहिती दिली.तसेच ग्रामिण भागातील युवक व्यवसायात येत असून त्यांना शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे अशी मागणी केली .यावेळी महाराष्ट्र राज्य फुल असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच प्रवरा नदीमध्ये जात असलेले सांडपाण्यामुळे पाणी दूषित होते, त्यावर उपाय म्हणून काय करावे लागेल याचीही माहिती दिली. यावेळी आ.लहामटे यांनी संदीप मालुंजकर,प्रा. डॉ सुरींदर वावळे आणि विनय सावंत यांना प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यास सांगितले त्यानुसार त्याची कारवाई केली जाईल असे सांगितले.
संदीप मालुंजकर यांनी आता पर्यंत पर्यावरणासाठी फार काम केले असून ते रोटरी क्लब अकोले चे पर्यावरण डायरेक्टर असून रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या सहकार्याने स्व खर्चाने प्रवरा नदी काठी 500 जांभळाचे झाडे लावणार असल्याचे आ.डॉ. किरण लहामटे यांना सांगितले. त्याबद्दल आ.लहामटे यांनी अभिनंदन करीत पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

