पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील जि. प.प्रा.शाळा,भोजदरी( विठे) ही शाळा खडक माळरानावर आदर्श व उपक्रमशिल शाळा असून अशा व्या सुंदर शाळेला रोटरी क्लब च्या माध्यमातून हॅपी स्कुल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केलं.
जि.प.प्रा.शाळा, भोजदरी शाळेस रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या पदाधिकारी व सदस्य यांनी सदिच्छा भेट देऊन शाळेने राबविलेल्या उपक्रमाची व केलेल्या प्रगतीची माहिती घेतली.

तसेच या शाळेला हॅपी स्कुल बनविण्यासाठी अजून काय करता येईल याची माहिती घेतली.यावेळी अध्यक्ष प्रा विद्याचंद्र सातपुते,सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी,
खजिनदार संदीप मोरे, पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख, पर्यावरण डायरेक्टर संदीप मालुंजकर,माजी अध्यक्ष
सचिन आवारी, गंगाराम करवर, निलेश देशमुख,अनिल देशमुख, विजय पावसे,माजी प्राचार्य संतोष कचरे,
डॉ प्रकाश वाकचौरे,
हेमंत मोरे आदी उपस्थित होते.
नुकतेच या शाळेची सुंदर परसबाग अभियान स्पर्धा अंतर्गत जिल्हा समितीने भेट देऊन परीक्षण केलेआहे. या शाळेचे शिक्षक अनिल कुटे यांना रोटरी क्लब च्या वतीने राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार देऊन या पूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच रोटरी क्लब ने या शाळेला परसबागेसाठी ठिबक सिंचन व्यवस्था करून दिली.या शाळेला ग्रामस्थ ही सहकार्य करीत असल्याचे पाहून रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या माध्यमातून या शाळेला हॅपी स्कुल बनविण्यासाठी काही मदत करता येईल का याची माहिती सर्व सदस्यांनी घेतली आणि हॅपी स्कुल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.यावेळी शाळेच्या सुंदर अशा परसबागेची पाहणी केली.
यावेळी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक अनिल कुटे व उपाध्यापक दिनकर अस्वले यांनी सर्वांचे स्वागत केले व शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.एकूण ६०ते ७० प्रकाराच्या वेगवेगळ्या वनस्पती,औषधी वनस्पती,मायक्रोग्रीन भाजीपाला,त्याचा होणारा शालेय पोषण आहारामध्ये वापर, विद्यार्थी गुणवत्ता,शिक्षकांची उपक्रमशीलता अशा सर्वच बाबतीत ही शाळा आघाडीवर आहे.याकामी ग्रामपंचायत विठे,भोजदरी ग्रामस्थ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,विस्तार अधिकारी सविता कचरे, केंद्र प्रमुख स्वाती अडाणे, यांचे विशेष मार्गदर्शन लाभत असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.विद्यार्थी कला पाहून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. विद्यार्थी राज शेळके याने आभार मानले.

चौकट- सुन्दर रमणीय परिसर,सर्व भाजी पाला पिकविलेली परसबाग,गांडूळ खताचा प्रकल्प,सुंदर रंगमंच, दोन उपक्रमशील शिक्षक व दोन टुमदार खोल्यांची शाळा मात्र १ली ते ५ वी पर्यंतची शाळा,एलसीडी प्रोजेक्टर, सुंदर माहिती ने रेखाटलेली भित्तिचित्रे,पाण्याची टाकी,सुंदर मारुती मंदिर व त्याला सुंदर सभागृह, स्वयंशिस्त प्रिय विद्यार्थी,प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वक्तृत्व कला, गुणवत्ता, एस एम सी अध्यक्ष यांचा साधेपणा, स्वयंपाकी ताईंचा आपलेपणा, प्रसिद्धीपासून लांब राहणारे शाळा आणि शिक्षक,अशी सर्व काही अप्रतिम असलेली शाळा म्हणजे एक पर्यटन स्थळच म्हणावे लागेल,अशा शाळेला प्रत्येकाने भेट द्यावी असे आवाहन अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त तथा रोटरी क्लब चे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले.

