पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी): रिसेल इंडिया संस्था व समाचार वाणी या वृत्तवाहिनीचा २०२४ चा उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी दिला जाणारा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार अक्षता रहाणे – पगार यांना जाहीर झाला आहे.
३ जुलै रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे – ब्रीज यांच्या हस्ते हा पुरस्कार अक्षता रहाणे यांना त्यांच्या पॅसिफिक इंटरप्रायझेस या गारमेंट उत्पादन उद्योगासाठी दिला जाणार आहे. अक्षता रहाणे यांनी आपले फॅशन डिझायनिंग मधील पदवी शिक्षण व गारमेंट कंपनी अनुभवानंतर ओझर मिग येथे पॅसिफिक इंटरप्रायझेस हि गारमेंट उत्पादन कंपनी सुरू केली. गेली तीन वर्ष शालेय गणवेष, कॉरपोरेट युनिफॉर्म, स्टाफ युनिफॉर्म,कंपनी व विविध व्यावसायिक कर्मचारी युनिफॉर्म उत्पादन व विक्रीतून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ओझर येथील कंपनीत २५ महिलांना रोजगार देवून महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अल्पावधीत केलेली प्रगती व महिला सबलीकरणासाठी पॅसिफिक एंटरप्रायझेस च्या अक्षता रहाणे पगार यांना हा पुरस्कार प्रदान होत असल्याचे पत्र प्राप्त झाले असून पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

