पुण्य वार्ता
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
या परीक्षेत प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये चौधरी दिनेश ८३.२०%, चौधरी गीता व सातव निकिता ८०.३०%, आव्हाळे प्रगती ७८.३०% व द्वितीय वर्ष डी फार्मसी मध्ये सोनवणे कालींदा ८९.००% पठारे सिद्धी ८८.६४%, चौधरी ममता ८८.३६% यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब, उपाध्यक्ष श्री राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड संदीप कदम, उपसचिव श्री एल एम पवार, खजिनदार अॅड मोहनराव देशमुख, सहसचिव श्री ए एम जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अश्विनी बनकर, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. मनोज जोगराना, प्रा. प्रियंका बोरुडे, प्रा. ज्योती दारकुंडे, प्रा. अश्विनी सांडगे, प्रा. ऐश्वर्या निचल, प्रा. स्नेहा वासनिक तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
