पुन्य वार्ता
गोल्डन ग्रुप 1975 च्या बॅच चे सुवर्ण महोत्सव वर्षाचे गेट टुगेदर उत्साहात पार
गोल्डन ग्रुपचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2025 चे गेट टुगेदरचा कार्यक्रम अगत्य कृषी फार्म हाऊस सावळी विहीर शिर्डी येथे उत्साही वातावरणात पार पडला. 1975 ची इ.१०वी एस एस सी. बोर्ड परीक्षेची शेवगाव इंग्लिश स्कूल(बाळासाहेब भारदे हायस्कूल )ची पहिली बॅच 50 वर्षापूर्वीची असून त्यामुळे गेट टुगेदर चे हे वर्ष सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे होते.
सर्वच मित्र ,मैत्रिणी आनंदाने सहभागी होवून गप्पांमध्ये गुंग झालेल्या.तेंव्हा गेली पन्नास वर्षाच्या शालेय जीवनाला उजाळा देण्यात आला सर्व सन्माननीय सदस्यांनी आपला जीवन पट सांगितला.
हुरडा ,जेवण, करमणूकीचे कार्यक्रम,बासरी वादन, विविध गाणी ,गौळण यांचा अगदी मनमुराद आनंद घेतला.
बोटिंग,रेन डान्स,बैलगाडी सैर, झुल्यावर चालणे,सर्वांनीच बालपण अनुभवले.
सुभाष गवळींनी योग साधनाचे महत्व आसनांचे व्दारे सांगितले.
अशा प्रकारे दोन दिवस घर, संसार बाजूला ठेवून आनंदात घालवले.
ग्रुपचे समन्वयक शहानवाज खान यांनी हे वर्ष सुवर्ण महोत्सवी असल्याने सर्व मित्र ,मैत्रीणींना त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.अशा उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बहुसंख्य मित्र,मैत्रिणी शहानवाज खान, नंदकुमार सातपुते,अरूण कुलकर्णी, हनुमंत लव्हाट, विलास वराडे, भगवान कुलकर्णी, डॉ.चंद्रकांत परदेशी, डॉ.अशोक ढोले, अशोक भालेराव, सुनील भारदे,सुभाष गवळी, बाबासाहेब घुगे, त्रिंबक डाके,भुजंग घुले, सदाशिव पालवे,प्रा.जयश्री शेळके, तारा देहाडराय,शैलजा दिवटे,चंदा मेहेर, सुनंदा सुसे,सुरेखा सातपुते,सौ.लव्हाट उपस्थित होते.
गेट टुगेदर म्हणजे उर्जेचा स्त्रोत ती साठवलेली उर्जा घेऊन जड अंतःकरणाने सर्व मित्र मैत्रिणींनी परतीचा प्रवास केला.
