पुण्य वार्ता
संगमनेर– प्रतिनिधी
आयुष्यात संमेलनात पुस्तक प्रकाशित होणे हे स्थानमहात्म आहे.संमेलनात सहभागी होणे आणि तेथे आपले पुस्तक प्रकाशित होणे,कविता सादर करण्याची संधी मिळणे या गोष्टी आनंद देणा-या आहेत.संमेलन हे जोवर साध्या माणसांचे आहे तोवर संमेलन होत राहतील.मोठया लोकांच्या हाती संमेलन गेले की, संमेलन संपतील असे प्रतिपादन 98 व्या अखिल भारतील साहित्य संमेलनाचे प्रमुख संयोजक व सरहददचे प्रमुख संजय नहार यांनी केले .ते संत महिमती पुस्तक कट्टयावर पुस्तक प्रकाशन संमारभात प्रमुख पाहुणे म्हणून होते.यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गो-हे,जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर,किशोरचे संपादक किरण केंद्रे,साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक एकनाथराव आव्हाड,संगिता बर्वे,प्रकाशन कट्याचे प्रमुख घनश्याम पाटील उपस्थित होते.
नहार आपल्या भाषणात म्हणाले की, दिल्ली व तालकटोरा ही मराठी माणसांची दुखरी जखम आहे.दिल्लीत मराठी माणसं एकत्र येत नाही.हे शहर कबीरीचे आहे.ते कारस्थानाचे शहर आहे.दिल्लीत संमेलन यशस्वी होत असे म्हटले जाते.मात्र हे संमेलन यशस्वी केले आहे.माणूस कोठेही गेला तरी मुळ मात्र विसरत नाही.दिल्लीतील लोकांचे मूळ महाराष्ट्रात आहे.आपल्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हे संमेलन कामी येईल.दिल्लीतील साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.आपल्याला जिंकायचे असेल तर येथील माती कपाळी लावून जाऊया.पुस्तक प्रकाशित होता आहेत.अनेक लेखकांनी ते लिहून मराठी साहित्यात भर टाकली आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी भाऊ तोरसेकर म्हणाले की,दिल्लीत होत असलेल्या या प्रकाशन सोहळ्याबददल अभिनंदन केले.दिल्लीचे स्थानमहात्म काही वेगळे आहे.आज पुस्तकांची शाळा भरली आहे अशा अनुभव मनात येतो आहे.पुस्तक आणि लेखक ज्या गतीने तयार होता आहेत त्या गतीने वाचक तयार व्हायला हवेत.पुस्तकं ही संस्कृती तयार करत असतात.ती समृध्द संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.आपल्याला भाषेची,संस्कृतीच्या अभिमानाची लाज वाटते तेव्हा संस्कृतीचा -हास सुरू होतो असे मत व्यक्त केले.यावेळी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांची दहा नाटके,हिरालाल पगडाल यांचे पुन्हा एकदा लंडन,प्रा.डॉ.राजेंद्र वामन यांचे 101 आजार आणि योग या पुस्तकाची हिंदी आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आली.चपराक प्रकाशनाची 31,लाडोबा प्रकाशनाची 7 पुस्तके प्रकाशित करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले तर आभार घनश्याम पाटील यांनी मानले.
वाकचौरे यांचे विशेष कौतुक – डॉ.गो-हे
शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाचे वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शिक्षण नामा,शिक्षणाचे प्रश्नोपनिषद,शिक्षणावर बोलू काही आणि शिक्षणाचिया व्दारी ही चार पुस्तके एकाचवेळी प्रकाशित झाली आहे.इतक्या कमी वेळात त्यांनी ही पुस्तके प्रकाशित करून विक्रम केला आहे.त्यांचे त्यासाठी विशेष अभिनंदन.एकाच व्यासपीठावर एकाचवेळी एवढी पुस्तके प्रकाशित झाली आहे.माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे.वाकचौरेंसाठी देखील हा प्रसंग अविस्मरणीयच म्हणायला हवा.यापुढे एकाचवेळी इतके पुस्तके प्रकाशित होतील असे वाटत नाही.वाकचौंरे यांच्या पुस्तक प्रकाशनाबददल अभिनंदन करत त्यांनी पुढील लेखनासाठी आपल्या भाषणात शुभेच्छा दिल्या.
