पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल व कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा
,पिंपळदरी यांच्या वतीने व रोटरी नेत्र रुग्णालय, संगमनेर यांच्या सहकार्याने पिंपळदरी येथे परिसरातील नागरिकांचे मोफत नेत्र( डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये 110 नागरिकांनी लाभ घेतला.त्यापैकी 25 नागरिकांना डोळे शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून 4 नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.तर आश्रमशाळेतील मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
तर अर्पण ब्लड बँक संगमनेर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच उपस्थित 110 महिला व पुरुष यांची रक्तगट मधुमेह तपासणी करण्यात आली. तर आश्रमशाळेतील 100 मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी व रक्तगट करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूक रहाण्याचे आवाहन केले.यावेळी रोटरी क्लब अकोलेचे माजी अध्यक्ष सचिन शेटे, अमोल वैद्य व सदस्य निलेश देशमुख तर रोटरी आय केअर हॉस्पिटलचे डॉ.संस्कार पाटील,संदीप घुले व बाळासाहेब देशमुख तर अर्पण ब्लड बँकेचे गणेश झोडगे व त्यांची टीम पिंपळदरी गावच्या सरपंच सुनीताताई मांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सचिन रंधे ,बाबासाहेब मांडे ,गणपत मांडे, माजी सरपंच श्रीरंग कडाळे ,स्कूल कमिटीचे अध्यक्ष चांगदेव रंधे , आकाश रंधे ,संपत मांडे, हरिचंद्र रंधे, नामदेव मांडे, रावसाहेब फटांगरे, यमुना रंधे, सुनील मांडे इत्यादी ग्रामस्थ तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मलाव सर,सुनील शेळके, राधेश्याम जगधने,अशोक कोरके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सहाणे यांनी केले तर आभार सुनील शेळके यांनी मानले.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


