पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या उंचखडक येथील राममाळावर वनराई फुलविण्यासाठी रोटरी क्लब अकोले च्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
अतुल लिमिटेड कंपनी,गुजरात व रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने उंचखडक येथील राममाळावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अतुल लिमिटेड कंपनी चे नाशिक व उत्तर नगर जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक अक्षय गवळी व मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर ऋषीकेश वामन ,रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सद्गुरू यशवंत बाबा ट्रस्ट चे महंत तथा विश्वस्त विठ्ठल पंत महाराज, उपसरपंच महिपाल देशमुख,ग्रामपंचायत सदस्य संजय गावडे,राजेंद्र शिंदे, अशोक रंगनाथ देशमुख, प्रकाश देशमुख
राजेंद्र देशमुख, आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महिपाल देशमुख यांनी राम मंदिर व परिसर विकास कामांची माहिती देऊन कंपनी ने व रोटरी क्लब अकोले ने देवस्थान परीसराच्या विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी 50 वृक्षरोपन करण्यात आले.

