पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द येथील शाळेत विद्यार्थीची गरज लक्षात घेऊन अंबिकानगर लहीत खुर्द वस्तीशाळा संस्थापक श्री अंकुश सावळेराम गोडसे यांनी शालेय साहित्य, वह्या,पेन , पेन्सिल सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या शालेय साहित्याचा विद्यार्थ्यांना खूप मदत झाली आहे. या मदतीबद्दल शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री शिंदे सर, सहशिक्षक श्री भागवत घुले सर, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रविण मिंढे,गावाचे सरपंच श्रीमती अनिता ताई गोडसे, डॉ किशोर गोडसे, श्री योगेश जाधव, श्री रविंद्र गोडसे, श्री प्रविण गोडसे, श्री संतोष मिंढे, श्री विनोद शिंदे यांनी आभार मानले

