पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी)
आयुष्यात आपण कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या पगाराची नोकरी व्यवसाय, व्यवसाय करा, पण या यशामागील खरे मानकरी असलेले आई वडील, जिथे शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्थेला कधीच विसरू नका असा संदेश प्रेरणादायी वक्ते व करियर मार्गदर्शक घनश्याम माने यांनी दिला. ते मातोश्री राधा फार्मसी कॉलेज वीरगाव च्या विद्यार्थी निरोप समारंभात बोलत होते.
अध्यक्ष स्थानी आनंदगड शैक्षणिक संकुलाचे सचिव डॉ अनिल रहाणे होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व केमिस्ट आरीफ तांबोळी, केमिस्ट असोसिएशन चे जिल्हा सचिव सचिन शिंदे, सदस्य केरू वाकचौरे, विवेकानंद पतसंस्थेचे संचालक अनिल डोळस, निलेश वाकचौरे, शिवराज वाकचौरे, प्राचार्या डॉ. पल्लवी फलके , प्रा. प्रतीक्षा रहाणे , श्री. भिलारे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना माने म्हणाले की, आपण आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी कॉलेज जीवनातील महत्वाचे दिवस संपवून नवीन वाटचालीसाठी सुरुवात करत असताना नेहमी आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या घटकांची आठवण ठेवली पाहिजे. आपले मित्र,शिक्षक , जिथे शिकलो ती शाळा कॉलेज व सर्वात महत्वाचे आपले आईवडील यांना कधीही विसरू नका.
कितीही मोठे व्हा, कितीही पगार कमवा, जगाच्या पाठीवर कुठेही असा पण आपण जिथे जीवनाचे व शिक्षणाचे धडे घेतले ते विसरू नका.
अनिल रहाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंदगडावर येणारा प्रत्येक जण आनंद घेवूनच जातो तोच आनंद घेवून आपण जात असला तरी आपल्या विरहाचे दुःख आम्हाला नेहमीच राहील. पक्षी घरटे सोडून विहार करतात तसे आपण आपल्या भविष्यासाठी या घरट्यातून बाहेर पडत आहात पण या घरट्याचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुले असतील असेही सांगितले. विद्यार्थी म्हणून बाहेर पडले तरी आनंदगडाचे सदस्य म्हणून तुमचे नेहमीच स्वागत असेल.कॉलेज ला अभिमान असेल असेच वर्तन आयुष्यात ठेवा व आदर्श विद्यार्थी, आदर्श पाल्य व आदर्श नागरिक बना असा सल्लाही रहाणे यांनी दिला.

प्राचार्या डॉ पल्लवी फलके यांनी ग्रामीण भागात अजूनही शहरी कॉलेज च्या तुलनेत तसूभरही आम्ही कमी पडलो नसून केवळ शैक्षणिक गुणवत्ता च नव्हे तर आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम कॉलेज ने केले आहे. तुम्हाला निरोप देताना त्रास होतोय पण नवीन संधी तुमची वाट पहात असल्याचे सांगितले.
प्रा.मनिषा शेरमाळे प्रा प्रवीण शेळके , प्रा. कनकधर अभिलाष, प्रा. वैभव गाढवे प्रा.कल्याणी म्हैसमाळे ,प्र प्रिया आंबरे
यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक प्रा. रेश्मा आढळ यांनी , सूत्रसंचालन प्रा.ऋतुजा भांगरे यांनी केले.यावेळी प्रा मयुरी मुंढे, काजल धुमाळ,प्रा. आकाश इंद्रेकर,प्रा.सोनाली भांगरे,उर्मिला मिंढे, विद्या वाकचौरे, रोहिणी निकम,
सुधीर गांडोळे, राहुल तोरमल, कामिनी देशमुख, आगिवले आदि
उपस्थित होते
[मातोश्री राधा फार्मसी कॉलेज च्या चतुर्थ वर्ष बी फार्मसी व द्वितीय वर्ष डी फार्मसी च्या कॅम्पस इंटरव्यू मधे निवड झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला]
डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


