पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)
अकोले तालुक्यातील आदर्श गाव शिळवंडी येथील माजी शिक्षक श्री-कान्हू पुना जी साबळे यांच्या पत्नी निसर्गवाशी सखुबाई कान्हू साबळे यांचा पिंडदान विधी व आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम दि-०८/०३/२०२५ रोजी शनिवारी पार पडला.. योगा-योगाने जागतिक महिला दिन असल्याने त्यांच्या मुली सौ-सुलोचना तानाजी भारमळ,सौ-सुनिता महादू निर्मळ, सौ-उषा निवृत्ती शिळकंदे, सौ-रेखा विजय शेळके व
सुनबाई गं. भा-छाया राजेंद्र साबळे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून गावातील दिडशे कुटुंबांना आपल्या आईची आठवण म्हणून प्रत्येकी एक आंब्याचे झाडाचे वाटप केले…
तसेच गावातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे मोहणीराज प्रतिष्ठान, व खंडोबा प्रतिष्ठान यांचे वतीने चालवला जाणारा आरोग्य निधी फंडात रोख ५००० हजार रूपयाची देणगी जमा केली…
संपूर्ण गावाच्या वतीने त्यांचे आभार शिळवंडी गावच्या सरपंच पुनम साबळे यांनी मानले…
या प्रसंगी गावातील प्रतिष्ठीत नागरीक माजी सरपंच चहादू शिवराम साबळे, माजी विस्तार अधिकारी रामनाथ लक्ष्मण साबळे, उपसरपंच मोहण साबळे,निवृत्ती भांडकोळी, वसंत साबळे,सोमा किसन बांडे ,तुकाराम साबळे,नामदेव साबळे, एकनाथ साबळे,जानकीराम साबळे यांचे उत्तम सहकार्य लाभले…


