पुन्य वार्ता
( अकोले प्रतिनिधी) अहिल्या नगर जिल्ह्यातील अकोले येथे आमदार बच्चुभाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व युवा जिल्हाप्रमुख एडवोकेट पांडुरंग औताडे यांच्या उपस्थितीत प्रहार मार्गदर्शक सरपंच बाळासाहेब खर्जुले, संदीप पाखरे, यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रहार जनशक्ती पक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संदीप हासे यांना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अकोले शहराध्यक्ष अरुण शिंदे, तालुका संघटक राजेश पवार, सोशल मीडिया प्रमुख संदीप हासे, यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रहार जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले यांनी सांगितले की निवडणुकीच्या माध्यमातून यश अपयश हे येत असते प्रहारच्या सेवेचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. युवक जिल्हाध्यक्ष यांनी अकोले निसर्गाने दत्त तालुका असल्याने प्रस्थापित पुढाऱ्यांचा जय जयकार करत बसण्यापेक्षा सेवेच्या यज्ञामध्ये सामील होण्याचे आवाहन केले. नूतन कार्यकारणीस प्रहार चे संदीप पाखरे यांनी शुभेच्छा दिल्या गाव तेथे शाखा अडचण तेथे प्रहार सैनिक मंत्र जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अकोले तालुक्यातून आलेले युवक व नागरिक उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने दशरथ रोकडे प्रकाश जोरवर सुनिल बोडके क्रुष्णा काळे सागर जाधव शुभम सहाणे सोनु सहाणे गोविंद सहाणे गोकूळ फोडसे ज्ञानेश्वर दिवे संदिप हासे संदिप बोडके मयुर बोडके विकास मेंगाळ मोहिनिराज नाईकवाडी निलेश बोडके अभिजित हासे निलेश बोडके राजेश पवार जगदिश टाकटे धनंजय वडितके रोहिदास भांगरे संजय गोडसे व परिसरातील प्राथमिक उपस्थित होते.
