पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ,मर्यादित अकोले च्या संचालक पदी शिवाजी काशिबा गायकर यांची बिनविरोध निवड झाली.
अमृतसागर दूध संघाचे संचालक कै.बबन किसन चौधरी यांच्या निधनाने नैमितीकपणे रिक्त झालेल्या संचालक पदाच्या सर्वसाधारण जागेसाठी आज निवडणूक प्रक्रिया अमृतसागर दूध संघाच्या कार्यालयात पार पडली.या रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेसाठी शिवाजी काशिबा गायकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी(अभ्यासी अधिकारी) तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था ,दुग्ध नाशिक सचिन खैरनार यांनी शिवाजी काशीबा गायकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर जाधव यांनी सहकार्य केले.
श्री शिवाजी काशिबा गायकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून संचालक आनंदराव रामभाऊ वाकचौरे यांनी स्वाक्षरी केली तर अनुमोदक म्हणून संचालक सुभाष सूर्यभान डोंगरे यांनी स्वाक्षरी केली.ही निवडणूक प्रक्रिया खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी अमृतसागर दूध संघाचे चेअरमन मा.आ.वैभवराव पिचड, संचालक आनंदराव रामभाऊ वाकचौरे, गोरक्ष गणपत मालुंजकर,शरद कारभारी चौधरी,आप्पासाहेब दादापाटील आवारी,रामदास किसन आंबरे,जगन वसंत देशमुख, अरुण दिनकर गायकर, गंगाधर गणपत नाईकवाडी, सुभाष सूर्यभान डोंगरे,बाबुराव शंकर बेनके,सौ.अश्विनी प्रवीण धुमाळ,सौ.सुलोचना भाऊसाहेब औटी,दयानंद नामदेव वैद्य,बाळासाहेब भाऊराव मुंडे,जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत,अधिकारी उपस्थित होते.
शिवाजी काशिबा गायकर हे योगिता दूध उत्पादक सह. संस्था,मर्यादित कण्हेर ओहोळ( ब्राह्मणवाडा) या संस्थेचे विद्यमान चेअरमन असून मा.आ.वैभवराव पिचड यांचे ते कट्टर समर्थक आहेत.
शिवाजी गायकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल अमृतसागर दूध संघाचे चेअरमन मा.आ.वैभवराव पिचड,व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, सर्व संचालक मंडळ, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत,अगस्ति साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब नाईकवाडी,भाजप अकोले मंडळाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, राकेश देशमुख, सोपान देशमुख, आबासाहेब मंडलिक,प्रणित गायकर, प्रतीक आरोटे,अक्षय आरोटे,सुरेश महाले,म्हतु जगताप,बाळासाहेब फापाळे,सागर गायकर, गणेश गायकर, बी.के.शिरसाठ,अजित फापाळे, ब्राह्मणवाडा ग्रामस्थ,दूध उत्पादक सभासद यांनी अभिनंदन केले.

