पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी – आपल्या विविध आवाजांनी अकोले तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले अशा राष्ट्रपती पुरस्कार विजेते, निसर्गवासी ठकाबाबा गांगड यांचे स्मृतिस्थळ उभारणार असून आदिवासी समाजाने एकत्र येऊन आदिवासी कला संस्कृती चे जतन करावे असे प्रतिपादन आ.डॉ.किरण लहामटे यांनी केले.
विविध पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारे,राष्ट्रपती पुरस्कार विजेते निसर्गवासी ठकाबाबा गांगड यांच्या पुण्यतिथी आदिवासी नृत्याच्या अविष्काराने उत्साहात साजरी झाली.त्यावेळी आ.लहामटे बोलत होते. यावेळी लोकपंचायत चे श्री .उबाळे,रघुनाथ उघडे,सरपंच कीर्ती गिर्हे,पडवळे साहेब,नारायण मेंगाळ,शिवाजी मेंगाळ,सखाराम गांगड,बुवाजी गांगड,कुसा मधे,बबन खंडे,रवींद्र मेंगाळ,आनंद मधे,छगन केदार,रामकृष्ण मधे,मनोहर आढळ,आदीसह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी नोकरवर्ग ठाकर व ठाकुर समाज उत्कर्ष संस्था (शाखा अकोले) आणि सर्व आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यातील उडदावणे या गावी गांगड बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध आदिवासी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.या मध्ये खास आकर्षण ठरलेले व नेहमी चर्चेत असलेले आदिवासी कांबड नृत्य, एकलव्य गौरी नृत्य,फुगडी नृत्य,होळी नृत्य आणि सनई पथक यांनी सर्व रसिक प्रेक्षकांचे मने जिंकली.

यामध्ये उडदावणे येथील आदिवासी पुरुषांनी आदिवासी कांबड नृत्य व एकलव्य गौरी नृत्य सादर केले,तर उडदावण्याच्या जि.प.शाळेतील लहान चिमुकल्यानी व पांजरे च्या नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.तसेच उडदावणेच्या माता जिजाऊ ग्रुप च्या महिलांनी व घाटघर आणि शिंगणवाडी च्या महिलांनी फुगडी नृत्य सादर केले.लव्हाळ वाडीच्या महिलांनी गौरी नृत्य सादर केले.तर शिंगणवाडीच्या व आंबीतच्या आदिवासी पुरुषांनी कांबड नृत्य सादर केले.घाटघर च्या पुरुषांनी होळी नृत्य सादर करून सर्व उपस्थित तांना ताल धरायला लावला.
उडदावणे येथील सनई पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी सर्व प्रथम ठकाबाबा गांगड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवरांनी गांगड बाबांच्या स्मृतीस उजळणी देण्यात आली.
स्वागत अशोक पथवे यांनी केले प्रास्ताविक सोमनाथ उघडे यांनी केले.तर सुत्रसंचलन गोरक्ष गांगड आणि गणपत उघडे यांनी केले तर आभार सखाराम गांगड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव सोंगाळ ,चंद्रभान मेंगाळ आदीसह संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

