पुण्य वार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव):-अकोले तालुक्यातील अंबड येथे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दिनांक १८ रोजी सायंकाळी ५ वाजता अंबड येथील शिवभक्त ज्योत आणण्यासाठी किल्ले शिवनेरीच्या दिशेने प्रस्थान करतील व किल्ले शिवनेरी गडावर रात्री मुक्काम करून पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून ज्योत प्रज्वलित करून परतीचा प्रवास सुरू करतील त्यानंतर शिवभक्तांचे ब्राम्हणवाडा याठिकाणी ज्योतीचे आगमन झाल्यावर ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर स्वागत करतील शिवभक्तांना चहा नाश्ता दिल्यानंतर ज्योतीचे दुपारी ४ वाजता आगमन होईल सायंकाळी ५ वाजता ज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल संपुर्ण गावाला वळसा घालून ज्योतीचे हनुमान मंदीराच्या सभागृहात आगमन झाल्यावर महाराजांची महाआरती होईल व त्यानंतर ७ ते ९ यावेळेत महाराष्ट्रातील युवा किर्तनकार ह भ प रमेश महाराज भोर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले असून त्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून गावातील व परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तरूण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
