सीताराम बुरके गुरुजींच्या जीवन प्रवासाची मन हेलावून टाकणारी यशोगाथा,
बुरके गुरुजी हे नाव ऐकले की ,त्यांचा प्रसन्न व हसरा चेहरा कोतुळकरांच्या व चिंचोलीकरांच्या नजरेसमोर उभा राहतो, सीताराम भिकाजी बुरके हे मूळ कोतुळ ता, अकोले येथील रहिवासी कै भिकाजी बुरके हे त्यांचे वडील,आई विठाबाई,तर भाऊ शांताराम, व निवृत्ती तर कै,नारायण बाळाजी शेळके गुरुजी (शिक्षक) हे त्यांचे मामा, कोतुळच्या बुरके कुटुंबात आई वडील 2 भाऊ व 5 बहिणी असा गोतावळा, बुरके कुटुंबाची परिस्थितीअत्यंत गरिबीची होती, त्यामुळे त्यांचे शिक्षणाची जबाबदारी शेळके मामांनी स्वीकारली, मामांनीच बुरके गुरुजींचा सांभाळ केला , मामाही त्यांचेवर जीवापाड प्रेम करायचे, बुरके गुरुजींच्या शिक्षणाचा भार मामांनी समर्थपणे पेलला होता, सीताराम ने शिक्षण घेऊन मोठे व्हावे ही इच्छा शेळके मामांच्या मनात होती, त्यामुळे शेळके गुरुजी यांनी त्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविले,आणि ती इच्छाही काही दिवसानंतर पूर्ण झाली लोणी काळभोर( पुणे) येथे बुरके गुरुजी शिक्षण घेत असताना त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून कॉल आला,शेळके गुरुजींचा भाचा आता शिक्षक झाला होता त्या वेळी शेळके गुरुजी यांची बदली चिंचोली गुरव ता,संगमनेर येथे होती, शेळके गुरुजीच्या लोभस व मायाळू स्वभावाने चिंचोली या गावी अनेक चांगली माणसे जोडली गेली,त्यामुळे त्यांनी नोकरीची 15 वर्षे चिंचोलीत पूर्ण केली, सीताराम बुरके ना आता नोकरी लागली पण छोकरी पाहीली पाहीजे, म्हणून चिंचोली येथील रामकृष्ण गोडगे यांना विचारणा करून त्यांची छानशी सूंदर मुलगी सरस्वती हिच्याशी शेळके मामांनी लग्न जमवले,या लग्नात कोतुळचे त्यांचे ,सोमदास पवार मामा व कोतुळचे ग्रामस्थ व नातेवाईक , व चिंचोलीतील मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता, विवाहाच्या बेडीत अडकल्यावर पुढे बुरके गुरुजींचा प्रपंच गाडा,कोतुळ येथे सुरू झाला, सुरुवातीला ते कोतुळ गावात रहात, प्रपंच चालवीत असतांना त्यांनी अनेक चांगली माणसे जोडली,शेतीची त्यांना खूप आवड असायची, पत्नी सरस्वती बुरके मशीन काम करून प्रपंचाचा गाडा चालवीत असे,प्रपंचरुपी रथ चालवताना रथाची दोन्ही चाके मजबूत असली पाहिजे,म्हणून रात्रंदिवस सरूताई रक्ताचे पाणी करून आपला प्रपंच पुढे नेताना दिसायची, काही दिवसानंतर कोतुळ येथील नदी पड्याल (पोरेवाडी) येथे त्यांनी शेती घेतली,तेथे घरही बांधले ,रिकाम्या वेळेत शेती करण्यात गुरुजी स्वतःला झोकून देत असत, शेतीचा त्यांना गाढा अनुभव असल्याने विविध प्रकारची पिके ते घेत असत,पुढे त्यांना 3 मुली व दोन मुले अशी 5 आपत्ये झाली,आज,तिन्ही मुली विवाहित असून आपापला प्रपंच पुढे नेत आहेत, मोठी मुलगी शोभा सिन्नर येथे दुकान व्यवसाय करते, तर दुसरी मुलगी वडगाव पान येथे घरची शेती, तर छोटी मुलगी नासिक येथे घरची शेती पहाते, सेवानिवृत्ती नंतर त्यांनी चिंचोली गुरव या गावीच राहण्याचा निर्णय घेतला,कोतुळ येथील शेती विकून त्यांनी चिंचोली गुरव येथे शेती घेऊन यशस्वी शेती करण्याचा प्रयत्न केला, मात्र नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या परिसरात त्यांना मनासारखी शेती करता आली नाही, चिंचोलीत सामाजिक कार्यात त्यांना गुरुजींचे मेहुणे लक्ष्मण गोडगे हे नेहमी बरोबर नेत असत, मेहुणे लक्ष्मण गोडगे, मोकळ गुरुजी,हेही शिक्षक असल्याने ते नेहमी बरोबर असत, कोतुळ येथें असतांना अकोले व संगमनेर तालुक्यात व परिसरात त्यांनी माणुसकीला आव्हान देत अनेक जिवंत नाती तयार केली, अकोले तालुक्यातील अनेक गावात त्यांची शिक्षक म्हणून बदली झाल्याने,तेथील जनतेशी त्यांचा घनिष्ट संबंध आला, कोतुळ येथील विठ्ठल देशमुख गुरुजी हे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक होते,सेवानिवृत्तीचा निरोप देताना तत्कालीन शिक्षण अधिकारी यांनी त्यांना आदर्श शिक्षक हा किताब देऊन गौरव केला होता,नंतर सासुरवाडी,चिंचोली या ठिकाणी त्यांनी अनेक माणसे जोडली,जी कधीही त्यांचे पासून दूर होऊ पहात नाहीत, स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विषेश गुण होता,कोतुळ येथे आल्यानंतर ते शेळके मामांच्याच घरी रहाणे पसंत करीत, शेळके गुरुंजीचे मावस भाऊ सोमदास पवार मामा यांचेकडेही त्यांचा संपर्क असायचा कोतुळच्या मामांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते प्रमुख भूमिका बजावत असत , शिवा अशोक शेळके (मंत्रालयीन अधिकारी) यांच्या आई सौ शांता हिच्या हातची लसणाची चटणी व तव्यlवरची बाजरीची भाकर खाऊन ते तृप्त झाल्याचा ढेकर देत असत,त्यांना आम्ही सर्वजण काका म्हणत असू, कोतुळ कडे आल्यावर शेळके गुरुजींचा मोठा मुलगा अशोक याला बरोबर घेऊन नातेवाईक व मित्र मंडळी यांना ते भेटी देत असत,बुरके गुरुजींचा गोतावळा अत्यंत मोठा होता,त्यांना 5 बहिणी व दोघे भाऊ व ते स्वतः ते असा आठ भावंडाचा मोठा परिवार होता, त्यांच्या वेळोवेळी अडचणी सोडविणे,यात ते नेहमी आग्रही असत, कोतुळ मधील धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढे असत, मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या विलक्षण आजाराने त्यांना पछाडले,मात्र तेव्हा त्यांनी मृत्युशी झुंज देत त्यावर विजय मिळविला होता, त्यांच्या मामांच्या व त्यांच्या हातून अनेक आदर्श विद्यार्थी घडले,तर अनेक विद्यार्थी विविध पदावर पुणे, नासिक, मुंबई, येथे अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना दिसतात, कोतुळचा श्री क्षेत्र कोतुळेश्वर महादेव हा त्यांचा आवडता देव होता,त्यांच्या तीन मुली व दोन मुले विवाहित असून त्यातील मोठा मुलगा दिलीप हा कुक्कुट पालन व प्रगतशील शेती करतो तर दिलीपचा मुलगा सुरज हा सुद्धा डॉक्टर आहे गुरुजींचा दुसरा मुलगा संजय हा डॉक्टर आहे, मात्र अचानक मागील वर्षी काळाने त्यांचेवर झडप घातली, आणी त्यांनी जीवनातील अनेक आठवणी मागे ठेऊन या जगाचा निरोप घेतला, मृत्यू समयी गृहवासीयांना नातेवाईकांना दुःख तर झालेच पण अनेक शिक्षक,मित्र, सगेसोयरे ग्रामस्थ यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर व दु:खीत अंतकरणाने उपस्थित असलेला जनआक्रोश अंत्य समयी पहावयास मिळाला, तर त्यांच्या सासूबाई वय वर्षे 109 ह्यांचेही अश्रू अनावर झाले त्या अजूनही हयात असून त्यांची नजर आजही चष्म्याशिवाय कोतुळच्या अशोक शेळके यांना लांबूनच ओळखते, जवळ घेऊन कुरवाळते .आरोग्य जपलेल्या बुरके गुरुजींच्या सासूबाई आपल्या जावयाबद्द्ल चे जुने अनुभव सांगतांना त्यांना त्यांच्या अश्रूंना मात्र आवर घालता येत नाही. सीताराम बुरके गुरुजी आज या जगात नसले तरीही त्यांचा आदर्श, सर्वाना प्रेरणा देतच राहील हे त्रिकाल बाह्य सत्य नाकारता येणार नाही शब्दांकन, अशोकराव शेळके, कोतुळ प्रतिनिधी *समर्थ गावकरी , *AVP न्यूज* अकोले, मो,9921583997