पुन्य वार्ता
मखमलाबाद (प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित होरायझन अकॅडमी मखमलाबाद शाळेत आज विद्यार्थी शपथविधी व पदग्रहण समारंभ अतिशय शिस्तप्रिय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार,सहा.पो.नि. सोडसे साहेब,कैलास कुशारे, मविप्र चे शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे संचालक गोकुळ काकड,प्रमोद पालवे,नितीन पिंगळे, बाळासाहेब पिंगळे,श्रीमती कल्पनाताई पिंगळे,शाळेच्या प्राचार्या श्रीमती भाग्यश्री लाडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी पंचवटी गुन्हे व अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे होते
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व सरस्वती पूजनाने झाली.
आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व परिचय शाळेच्या प्राचार्या श्रीमती भाग्यश्री लाडोळे यांनी पुष्पगुच्छ,पुस्तक,शाल व श्रीफळ देऊन केला.
प्रास्ताविकातून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा शिरसाठ यांनी शपथविधी व पदग्रहण समारंभाविषयी माहिती दिली व निवडून आलेल्या विद्यार्थ्यांची पाहुण्यांना ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया व लोकशाहीचा अभ्यास चांगल्या प्रकारे माहिती व्हावा,यासाठी जशी प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया पार पडते. त्याच पद्धतीने शाळेच्या आवारात मतदानाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले अमूल्य मत लोकशाही पद्धतीने देऊन मतदान प्रक्रिया अनुभवली.तसेच शाळेच्या प्राचार्या व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ओम वायचळे व अनुष्का पिंगळे यांची निवड झाली.तसेच अनुष्का कातड,श्रेयस पिंगळे,अस्मिता काकुस्ते,जय पगारे,दिशा भोये, आदित्य जाधव,देविका ढाले,निशांत सोनवणे आदी सहाय्यक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले.
निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शपथ व पदग्रहण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या विद्यार्थ्यांनी परेड करत सर्व पाहुण्यांना मानवंदना दिली. देशाची सेवा करण्याची उमेद मनात ठेवून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांची मने जिंकली.
यावेळी मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आजच्या कार्यक्रमामुळे मन भरून आले असे गौरवोद्गार काढले. जणूकाही लष्कराची परेड बघण्याचा मान मिळाल्यासारखे वाटले तसेच या मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना लोकशाही बद्दल ज्ञान जागृत होते व अतिशय योग्य विद्यार्थ्यांची निवड होते असे सांगितले व नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे यांनी आपल्या भाषणातून शाळेबद्दलची आत्मीयता दाखवताना शाळा कशा पद्धतीने उभी राहिली व शाळेतून कित्येक हिरे खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातून आपले नाविन्य मिळवत आहेत याचे उदाहरण देताना राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या शाळेच्या विद्यार्थिनी कीर्ती कुटे, प्रतिक्षा शिंदे यांची आठवण त्यांनी करून दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणातून पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी होरायझन अकॅडमी मखमलाबाद आपल्यासाठी अतिशय योग्य व्यासपीठ असल्याचे सांगितले. तसेच इंग्रजीतून शिक्षण व मराठी संस्कार यांचा पाया घालण्याचे काम शाळेमार्फत केले जाते असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी नित्यनेमाने पुस्तके,जीवनचरित्र, कादंबऱ्या,लेख,वर्तमानपत्र वाचली पाहिजेत. ‘वाचाल तर यशस्वी व्हाल’ हे त्यांचे वाक्य सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.पुढे बोलताना त्यांनी पूर्वीचा समाज व आत्ताचा समाज यात भरपूर बदल झालेला आहे, विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत आहेत याचा गैरवापर न करता आपल्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती व चांगले स्वप्न उराशी बाळगा असे सांगितले. यासाठी त्यांनी नुकतेच अंतराळातून परत आलेल्या शुभांशू शुक्लाचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. तसेच विद्यार्थ्याला जीवनात अनेक प्रश्न पडले पाहिजेत व त्याने त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे जाताना एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करताना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भौगोलिक अभ्यास केला पाहिजे व छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून त्यातून ज्ञानग्रहण केले पाहिजे.कारण विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस असतो याचे उदाहरण देण्यासाठी त्यांनी मधमाशीचे उदाहरण दिले मधमाशी एक ग्रॅम मध गोळा करण्यासाठी लाखो फुलांवरती जात असते असे सांगितले. तसेच पुढे प्रत्येकाकडे कुठली ना कुठली कमतरता असते ती विचारात न घेता आपल्याकडे जी चांगली गोष्ट आहे ती घेऊन पुढे गेले पाहिजे आपण नक्कीच जीवनात यशस्वी होऊ, यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांचे उदाहरण दिले की त्यांना अभिनय क्षेत्रात आवड होती परंतु त्यांच्या उंचीमुळे त्यांना घेण्यास नकार देण्यात आला होता. परंतु त्यांनी तिथे न डगमगता आकाशवाणी केंद्रावर वार्ताहर म्हणून काम केले यातून त्यांचा आवाज अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी ऐकला व त्यांना अभिनयाची संधी दिली तर आज ते संपूर्ण विश्वात सुपरस्टार आहेत. अशी अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना सुनील पवार यांनी प्रोत्साहित केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक आदेश पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले
तसेच गौरव देशमाने, निलेश भागडे, अमोल ससाने,रमण पिंगळे,स्नेहा बदादे, विनीत जगताप, तेजस जाधव, शिवानी गौड, प्रसाद शिंदे, सृष्टी पवार, उज्वला मुठाळ, पूजा पिंगळे, पूनम पिंगळे, अर्चना दवंगे, रूपाली गायकवाड, दिपाली अहिरे, नलिनी भवर निकिता पिंगळे, कविता गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन गार्गी शेळके व दिशा भोये यांनी केले तर आभार सुप्रिया चव्हाण यांनी मानले

