पुण्य वार्ता
डोंगरगाव – डोंगरगांव ( ता.अकोले ) येथील रखमाबाई मारुती उगले यांचे नुकतेच अल्पअजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्या 60 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मारुती चिमण उगले दोन मुले संदीप मारुती उगले व सुनिल मारुती उगले एक मुलगी संगिता सुरेश कानवडे, भाऊ कारभारी शंकर नवले,कचरु शंकर नवले,सुर्यभान शंकर नवले,नातवंडे सोहम,यश,शार्विल, अनुष्का,तनुष्का,सईशा,चेतन कानवडे,सोनाली कानवडे तसेच पुतणे, जावई असा मोठा परिवार आहे. भाजपाचे नेते सुनील मारुती उगले व संदीप मारुती उगले यांचे त्या मातोश्री होत.
डोंगरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक 11 रोजी सकाळी 8.वा.आढळा नदी तीरावरती करण्यात येईल…
या वेळी ह.भ.प.किशोर महाराज खरात यांचे प्रवचन होईल.

