पुण्यवार्ता
प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव) :-अंबड ,तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथे ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान’ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. गोर्डे व्ही एस यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर श्री. गायकवाड आर. एन. उप कृषी अधिकारी, अकोले यांनी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना’ची ओळख करून दिली. त्यांनी या अभियानाचे फायदे आणि महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या अभियानात सहभागी होऊन नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. त्यानंतर डॉ. श्री रोकडे आर.सी. मंडळ कृषी अधिकारी, अकोले यांनी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान’ विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अभियानात राबवण्यात येणाऱ्या सर्व बाबींची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. त्याचबरोबर उप कृषी अधिकारी श्री वायाळ बबन यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या कृषी सखी यांनी देखील त्यांना प्रशिक्षणात दिलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोचवले या कार्यक्रमासाठी गावातील मा. श्री गिरजाजी जाधव रोहिदास जाधव कैलास कानवडे यांची विशेष उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावातील अभियानात समाविष्ट असलेले शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सखी सोनाली जाधवआणि कृषी सखी रेश्मा नाईकवाडी मनोज जाधव संजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी अंबड ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करून श्री रमेश जाधव यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


