पुन्य वार्ता
अकोले, प्रतिनिधी:
अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील विरगाव या गावातील ह.भ.प. एकनाथ धोंडीबा अस्वले आणि सौ. लहानबाई एकनाथ अस्वले यांचा मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा व सहस्र चंद्र दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने गावात आध्यात्मिक आणि सामाजिक चैतन्याची लहर निर्माण केली.
ह.भ.प. एकनाथ अस्वले यांनी समाजसेवा, अध्यात्म, आणि संस्कृती संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित कीर्तन, प्रवचन, आणि सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक मिरवणूक आणि लेझीम पथकाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालून निघाले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये नाशिक येथील नामवंत उद्योजक संदीप भाऊ पवार (नाशिक), आणि कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अशोक देशमुख, बाजीराव अस्वले, विलास नजान, आणि राजू अस्वले यांनी केले.
ह.भ.प. एकनाथ अस्वले यांनी अध्यात्म, समाज प्रबोधन, आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या सोबत सौ. लहानबाई अस्वले यांचे सहकार्य व त्यांच्या समाजसेवेतील भूमिका या दोघांचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून समोर ठेवते.हभप योगी केशव बाबा चौधरी, हभप गणेशानंद महाराज पुणेकर, हभप मनोहर महाराज भोर, हभप रामनाथ महाराज जाधव, हभप दीपक महाराज देशमुख, हभप राजेंद्र महाराज सदगीर, हभप विवेक महाराज केदार, हभप तुकाराम महाराज चोखंडे, हभप रमेश महाराज भोर, हभप सोमनाथ महाराज भोर, हभप सोमनाथ महाराज चौधरी, हभप राजेंद्र महाराज नवले, ह भ प चंद्रकांत महाराज चौधरी, हभप अमोल महाराज भोत, ह भ प गौतम महाराज एखंडे, हभप केरू महाराज केदार, ह भ प नितीन महाराज देशमुख, हभप प्रविण महाराज पांडे, हभप संकेत महाराज आरोटे, हभप जनार्दन महाराज मोरे, ह भ प चंदन महाराज नेवासकर, श्री. भाऊ खरात, श्री.पर्बतराव नाईकवाडी, श्री. किसनराव शेटे, श्री.जालिंदर वाकचौरे, श्री.रामनाथ बापू वाकचौरे, श्री.रावसाहेब वाकचौरे, श्री. माधवराव तिटमे यासह पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते….

कार्यक्रमाला हजारो समाजबांधव आणि अनुयायांनी उपस्थिती लावली. गावातील ग्रामस्थांनी आणि अनुयायांनी एकत्र येत हा सोहळा भव्य स्वरूपात पार पाडला.
सहस्र चंद्र दर्शन सोहळा आणि कृतज्ञता सोहळ्याने समाजात परंपरा व संस्कारांचे महत्व अधोरेखित केले असून, हा सोहळा नवी पिढी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे…….. या उपक्रमाने संपूर्ण राज्याला एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे या जगात अनेक लोक आपल्या जन्मजात या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात मात्र पंढरपूर गाडंगापूर. या देवांचे दर्शन घेऊन आपल्या आई-वडिलांमध्येच खरे देव असल्याचे या अस्वले परिवाराने दाखवून दिले या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हाच संकल्प अस्वले परिवारातील सोमनाथराव अस्वले या सुपुत्राने आपल्या आई वडिलांचा केलेला सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला व वारकरी संप्रदायाला व शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाला मन हे लावून टाकणारा ठरला कार्यक्रमानंतर सर्वांना गोड भोजनाने या सोहळ्याचे सर्वांनीच कौतुक केले….

