पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण उपकेंद्र अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजार डेंगू, चिकनगुनिया इत्यादी आजारांविषयी संपूर्ण गावात आरोग्य शिक्षण देऊन कंटेनर सर्वे करण्यात आले. तसेच साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्यात आले. गावातील गॅरेज दुकानात जाऊन पडीक टायरची विल्हेवाट आणि टायर तपासणी करण्यात आली.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, सभोवतालाचा परिसर स्वच्छ ठेवावे, साचलेले पाणी वाहते करावे, कोणताही ताप हिवताप असू शकतो, गप्पी मासे पाळा हिवताप टाळा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करा, डंक छोटा धोका मोठा इत्यादी आरोग्य शिक्षण देण्यात आले.
आरोग्य सेवक जगदीश पाटील यांनी देवठाण गावात चांगल्या प्रकारे काम केले आहे.
या कामी वैद्यकीय अधिकारी डॉ नागरे, डॉ अदिती देशमुख, आरोग्य सहायक इंदवे, व देवठाण गावातील ग्रामस्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

