पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड )-
झाड नामाची समाधी,झाड तुकोबाची गाथा,जगताला जगवते झाड सहयाद्रीचा माथा. निसर्गासारखा नाहिरे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप,त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप.म्हणूनच वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका.पर्यावरणाची काळजी घेईल तर आपला देश महान होईल. काम करा लाख मोलाचे निसर्ग संवर्धनाचे.पर्यावरणासाठी झाडे लावा देश वाचवा,दुनिया वाचवा.झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा. हाच युक्तीवाद ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात समाजासाठी जपला असे अकोले तालुक्यातील रूंभोडी गावचे प्रसिद्ध उद्योजक वृक्षप्रेमी, सामाजिक बांधिलकी जपणारे संदीपशेठ मालुंजकर यांनी राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास १००० देशी रोप ५१ गुलाब रोप भेट स्वरुपात दिली आहे. या रोपांचे विदयालयाचे प्राचार्य बादशहा ताजणे तसेच उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे,क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप केले.त्यामुळे बालगोपाळ वर्गात उत्साह पहायला मिळाला. संदीप मालुंजकर यांनी विदयालयास आणखी १००० रोप देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.यापूर्वीही त्यांनी चाळीस हजार रोपांचे वाटप केले आहे.म्हणूनच संदीपशेठ मालुंजकर यांच्या बाबत दानशूर व्यक्तींच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही. त्यासाठी देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दीवस देणाऱ्याचे हात घ्यावे.असे म्हणावेसे वाटते.
या स्तुत्य उपक्रमाचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, सर्व संचालक,विद्यालयाचे प्राचार्य बादशहा ताजणे,उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक सदाशीव गिरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
