पुण्य वार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव):-अहिल्यानगर जिल्ह्यातील संघाने पालघर येथे झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत ठाणे संघाला हरवून तिसरा क्रमांक पटकावला आहे यामध्ये प्रा बाबा गायकवाड प्रा सुनिल मंडलिक तसेच (टग ऑफ वार) रस्सीखेच स्पर्धेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा माधवी पाटील तसेच बापूसाहेब आहेर महाजन सर यांनी विजेता संघाचे कौतुक केले
या स्पर्धेत अहिल्यानगर संघाच्या वतीने करन कोल्हाळ अनूज जाधव सुयश भोर अजिंक्य भोर ऋषिकेश भोर सुदर्शन जाधव अदित्य भोर संकेत भोर प्रणव आवारी दयानंद पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी अंबिका माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक कैलास कोते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे नुतन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे आमदार अमोल खताळ डॉ सुजय विखे खासदार भाऊसाहेब वाकचौरे ठाणे जिल्हा डॉक्टर असोसिएशयनचे अध्यक्ष डॉ जालिंदर भोर अंबिका विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गिरजाजी जाधव अंबड गावच्या सरपंच सुरेखा हासे उपसरपंच नाथा भोर या सरपंच शिवराम भोर दत्तू जाधव तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळचंद भोर उपाध्यक्ष मधूकर भोर सोसायटीचे चेअरमन परिक्षीत भोर व्हाईसचेअरमन कैलास कानवडे दुध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब भोर व्हाईस चेअरमन माधव भोर अंबिका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर टी जाधव सर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

