पुण्य वार्ता
गणोरे प्रतिनिधी
जगन्नाथ आहेर.
गणोरे ( ता. अकोले) येथे दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी १ जुलै शेतकरी दिनी सकाळ पासुन शुभम आंबरे व संदिप दराडे हे उपोषण करत आहे. उपोषणाचा चौथा दिवस असुन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालवली आहे.अजुनही प्रशासनास जाग न आल्याने गणोरे येथे संतत्प शेतकऱ्यांनी शासनाला झोपेतुन जागे करण्यासाठी गुरुवार दि ४ जुलै रोजी गणोरे येथे संगमनेर अकोले मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी रास्ता अदोलन करण्यातआले.यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या संतंप्त भावना मांडुन संताप व्यक्त केला. रास्ता रोको आंदोलन जवळपास तीन तास वहातुक खोळबंली होती.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे,उपसरपंच प्रदिप भालेराव,डोंगरगांवचे माजी सरपंच बाबासाहेब उगले, हिवरगावचे भाऊसाहेब नाईकवाडी, अनिल आंबरे, दातीर, माजी उप सरपंच के.बी आंबरे,माजी सरपंच अशोक आंबरे, निवृत्ती दातीर, डाॅ सचिन दातीर,तुशार आंबरे, निवृत्ती आंब्रे,बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाचवा दिवस चालु आहे उपोषण कर्ते शुभम आंबरे व संदिप दराडे यांची प्रकृती खालवली आहे. येत्या दोनदिवसात शासनाने दुध दर वाढी संदर्भात निर्णय घेतला नाही थर गणोरे,हिवरगांव,डोंगरगांव, पिंपळगांव व विरगाव परिसरातील शेतकरी आपले संपूर्ण कुटुंब व जनावरासह तहसीलदार कचेरीव येऊन अंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी गणोरे पंचक्रोशीतील दुध उत्पादक शेतकऱी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.


