विरगाव (ज्ञानेश्वर खुळे)--
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष आणि अकोले विधानसभेचे संभाव्य उमेदवार अमित अशोकराव भांगरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विरगाव येथे पार पडला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांद्वारे हा वाढदिवस साजरा करताना विरगावच्या जि.प.प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव दत्तात्रय आस्वले, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष नानासाहेब वाकचौरे,बाजार समितीचे माजी संचालक भागवतराव कुमकर,सुदेश मुतडक,ह.भ.प.रामनाथ महाराज आस्वले,एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अशोक माळी, संतोष आस्वले, योगेश वाकचौरे, मोहन वाकचौरे, रोहिदास चव्हाण, आबासाहेब थोरात, सुखदेव राक्षे, अंबादास आस्वले, पांडुरंग गोरे, बाळासाहेब आस्वले आदींसहित ग्रामस्थ हजर होते.