पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत पिंपळगाव निपाणी येथे डॉ वेदांत सागर (नामदेव दामु गोर्डे)यांचा आगमन सोहळा तसेच भव्य मिरवणूक सोहळा गुरुवार दिनांक १०ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी साडे आठ वाजता आयोजित करण्यात आला असून सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी सात वाजता श्री संटुआई जगदंबा माता मंदिर येथे महाआरती व रात्री साडे आठ वाजता डॉ वेदांत सागर यांचे श्रीकृष्ण कर्मयोग (संस्कार आणि श्रम) या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी.
या सोहळ्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ तन मन धनाने प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गावभर डॉ वेदांत सागर यांच्या आगमनाचे तसेच स्वागताचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. डॉ वेदांत सागर (नामदेवराव गोर्डे) हे पिंपळगाव निपाणीचेच भुमीपुत्र असल्याने तसेच ते विद्यार्थी वयातच त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी पिंपळगाव निपाणीचा निरोप घेऊन अनेक वर्ष आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही आणि आज नामदेव दामु गोर्डे या नावाने ओळखले न जाता डाॅ.वेदांत सागर (गुरुजी) या नावाने सुपरिचित आहेत.त्यांनी हा बदल कशा पद्धतीने घडवला याचे रहस्य जाणून घेण्यासाठी तसेच आपल्यातील एखाद्या व्यक्तीमध्ये काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या आगमनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे समजते .


