पुन्य वार्ता
अकोले, प्रतिनिधी
अकोले शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आज शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शालेय वस्तूंचे वाटप केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्र येऊन, विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, व इतर शालेय साहित्याचे वितरण केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून ह.भ.प. नितीन महाराज गोडसे संस्थापक कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या वारकरी विद्यार्थ्यांना कोतूळ या ठिकाणी वह्या, पेन व शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या!
गेल्या दोन दिवसात कळंब येथील कर्मयोगी मारुतीराव लांडगे पाटील विद्यानिकेतन, लिंगदेव येथील लिंगेश्वर विद्यालय, आदिवासी एकता मूकबधिर निवासी विद्यालय अकोले येथे शालेय वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि इथून पुढेही हे कार्यक्रम चालू राहणार असून एक लाख वह्या वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे डॉ.विश्वासराव आरोटे यांनी सांगितले!
या कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यास मदत करणे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे हा होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय वस्तूंची सोय करणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे. यामुळे त्यांना शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल.” अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि पत्रकार संघाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी आपल्या नव्या वस्तूंच्या आनंदात चेहऱ्यावर हसू फुलवले. ह्या कार्यक्रमा वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने या पुढेही असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले आहे.

