पुण्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
माय मराठी अध्यापक संघान आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत गणोरे येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अधिरा अमोल खतोडे प्रथम तर पायल दिनेश दातीर
तनिष्का प्रकाश जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावुन शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
कु.तनिष्का प्रकाश जाधव हिने सलग तीन वर्ष वेशभूषा स्पर्धेवत तालुकास्तरावर २०२२-२३ एकदा तालुक्यामध्ये प्रथम २०२३-२४ माय मराठी स्पर्धेत द्वितीय क्रमांक २०२४-२५ तालुक्यात माय मराठी अध्यापक संघ आयोजित वकृत्वस्पर्धा तृतीय क्रमांक तर कु.पायल दिनेश दातीर हिने सलग तीन वर्ष वकृत्व स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर २०२२-२३ मध्ये तालुक्यात प्रथम २०२३-२४ तालुक्यात प्रथम व जिल्हा स्तरावर तृतीय २०२४-२५ तालुक्यात तृतीय क्रमांक या दोन्ही विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षिका श्रीमती अस्मिता डमाळे यांनी मार्गदर्शन केलं
कु.अधिरा अमोल खतोडे हिने २०२४-२५ वकृत्व स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला या विद्यार्थिनीला मार्गदर्शन श्रीमती अश्विनी झिरमेटी यांनी केली
या विद्यार्थिनींचे अभिनंदन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटी सर्व पतसंस्था सर्व दूध डेरी अंबिका माता देवस्थान ट्रस्ट शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ विस्तार अधिकारी अनिल गायकवाड केंद्रप्रमुख घुले मुख्याध्यापक अशोक नेहरकर शिक्षक बाबासाहेब गवांदे, तात्यासाहेब मंडलिक, भगवंत साबळे, वंदना दातीर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून कौतुक केले.

