पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने
अकोले तालुक्यातील 10 वी ,12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप सोमवार दि.8/7/2024 रोजी सकाळी 11.30 वाजता
मातोश्री लॉन्स ,इंदोरी फाटा येथे
नव निर्वाचित खासदार निलेश लंके,आमदार डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी दिली.
ते पूढे म्हणाले की, या कार्यक्रम प्रसंगी शिर्डी साईबाबा संस्थान चे विश्वस्त डॉ.जालिंदर भोर,पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील,गट शिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ,प्रकल्प अधिकारी राजन पाटील,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर,पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन तालुकाध्यक्ष अशोकराव उगले,कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सेक्रेटरी हरिभाऊ फापाळे व सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांनी केले.


