पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी): मराठी चित्रपट सृष्टिची आघाड़ी ची नायिका किशोरी शहाणे यांच्या हस्ते रिसिल इंडियाचा २०२४ चा उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी दिला जाणारा मानाचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार अक्षता रहाणे – पगार यांना प्रदान झाला.
नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे – ब्रीज व कंपनी चे मुख्य कार्य.अधिकारी सुधीर पठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार अक्षता रहाणे यांना त्यांच्या पॅसिफिक इंटरप्रायझेस या गारमेंट उत्पादन उद्योगासाठी प्रदान करण्यात आला. अक्षता रहाणे सारख्या नवोदित महिला उद्योजकाना या पुरस्काराने प्रेरणा भेटुन महाराष्ट्रा ला अनेक चांगले उद्योजक भेटतील असा आशावाद किशोरी शहाणे यानी व्यक्त केला .फॅशन डिझायनिंग मधील उच्च शिक्षणानंतर नोकरी च्या मागे न लागता आपल्या व्यवसायातून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असुन महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अल्पावधीत केलेली प्रगती व महिला सबलीकरणासाठी पॅसिफिक एंटरप्रायझेस च्या अक्षता रहाणे पगार यांचा प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन सुधीर पठारे यानी केले. अक्षताचे पती पराग पगार, सासरे प्रशांत पगार, सासू सुरेखा पगार,आई गीता रहाणे, वडिल अनिल रहाणे, संगीता दले यांच्यासह हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्कारा बद्दल अक्षताचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


