पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी रोटरी मोफत नेत्र तपासणी केंद्र सुरू होऊन सहा महिने झाले असून ३१ डिसेंबर २०२४ अखेर १०२० नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला असल्याची माहिती अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.१० जून २०२४ रोजी रोटरी नेत्र रुग्णालय,
संगमनेर ,रोटरी क्लब संगमनेर यांच्या सहकार्याने अकोले येथे रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने अकोले येथे रोटरी मोफत नेत्र तपासणी केंद्र सुरू केले.या डोळे तपासणी केंद्रावर आता पर्यंत ६५० नागरिकांनी डोळे तपासणीचा लाभ घेतला तर याचा लाभ तालुक्यातील इतर नागरिकांनाही व्हावा म्हणून अनेक गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती त्या शिबिरामध्ये ३७०नागरिकांनी असे एकूण १०२० नागरिकांनी डोळे तपासणीचा लाभ घेतला.यामध्ये धामणगाव आवारी,इंदोरी,राजूर,अकोले,कोतुळ,येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चौकट- नवीन वर्ष २०२५ च्या जानेवारी महिन्यात ६ जानेवारी रोजी पाडोशी येथे,दि.९ जानेवारी रोजी मवेशी येथे,दि.१४ जानेवारी रोजी शेंडी(भंडारदरा), दि.१६ जानेवारी रोजी फोपसंडी येथे, दि.२३ जानेवारी रोजी ब्राह्मणवाडा येथे दि.३० जानेवारी रोजी अकोले या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा व ज्या गावात असे शिबीर व्हावे अशी कोणाची इच्छा असेल तर त्यांनी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सह सचिव समीर सय्यद,खजिनदार संदीप मोरे,पब्लिक इमेज हभप दीपक महाराज देशमुख व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.
या मोफत नेत्र तपासणी साठी डॉ.यशश्री डावरे, डॉक्टर सुहास दिवटे, डॉ.मिलिंद साखरे,अमोल गुंजाळ,संदीप घुले, अंकुश आहेर रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर अध्यक्ष संजय राठी, त्यांचे सर्व सहकारी, रोटरी क्लब संगमनेर चे अध्यक्ष साईनाथ साबळे,माजी अध्यक्ष आनंद हासे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
