पुण्य वार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव):-अकोले तालुक्यातील अंबड गावच्या उपसरपंचपदी नुकतीच प्रमोद भोर यांची एकमताने निवड करण्यात आली.
नाथा भोर यांनी चार वर्षे उपसरपंच म्हणून चांगले काम केले.गावात अनेक विकासकामे आणली सहकार्यांना संधी मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे नवीन निवडीसाठी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुरेखा हासे यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सर्व सदस्यांची सादक, बादक चर्चा झाली. व त्या नंतर प्रमोद भोर यांच्या नावाची सुचना संदिप जाधव यांनी मांडली. त्यांस सर्व सदस्यांनी समंती दिली. यावेळी मावळते उपसरपंच नाथा भोर यांचा सत्कार करण्यात आला. व त्या नंतर विद्यमान उपसरपंच प्रमोद भोर यांचा उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ए, डी, सी, सी बँकेचे निवृत्त शाखाअधिकारी माधवराव भोर, जेष्ठ नेते नामदेवराव जाधव, मा पोलिस पाटील भाऊसाहेब कानवडे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळचंद भोर, उपाध्यक्ष मधुकर भोर, मच्छिंद्र जाधव, रामचंद्र हासे, भास्कर भोर, संतोष भोर, सोमनाथ हासे, संदिप भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका शेलार यांनी काम पाहिले. सदर निवडीचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
