पुण्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
जगन्नाथ आहेर
दुधाला कायम स्वरुपी प्रतिलिटर चाळीस रुपये बाजार मिळावा व राज्यात दुध मुल्यअयोगाची स्थापना व्हावी.आदी मागण्यांसाठी गणोरे ( अकोले ) येथे बाजार तळावर आज सोमवार दि १ जुलै पासून शुभम आंबरे व संदिप दराड हे दोघे आमरण उपोषणाला बसले आहे.यावेळी पंचक्रोशीतील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या अंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देऊन शासना विषयी आपल्या जळजळीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळावा,राज्यात दुध मुल्यअयोगाची स्थापना व्हावी,पशु खाद्याचे भाव कमी व्हावे,शासकिय अनुदानातुन पशु विमा योजणा सुरु करावी, दुधाला उसा प्रमाणे एफ आर पी च्या धर्तीवर किमान रास्त व फायदेशीर दर देण्यात यावा, दुध व दुग्धजन्य पदार्थांची आयात बंद करुन निर्यातीला प्रोत्साहन मिळावे. अजित पवार यांनी अर्थ संकल्पात एक जुलै पासून दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहिर केले आहे.परंतु केवळ दुधाला पाच रुपयाची भिक आम्हला नको आहे कयम स्वरुपी हमी भाव प्रती लिटर चाळीस रुपये मिळला पाहिजे.यासाठी गणोरे सोमवारी सकाळ पासून येथील बाजार तळावर दुध उत्पादक शेतकरी बेमुदत तोडगा निघत नाही तो पर्यंत दुध उत्पादक शेतकरी उपोषण करत आहे.ठिक ठिकाणी दुध प्रश्नी अधिक तीव्र आंदोलने होत आहे गणोरे येथील उपोषणाला राज्यभरातुन मोठा पाठिंबा मिळत आहे.अनेक जण उपोषण स्थळी दाखल होउन उपोषणाला पाठिंबा देत आहेत.
दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने गणोरे येथील मध्यवर्ती ठिकाणी बाजार तळावर शभम आंबरे व संदिप दराडे आमरण उपोषण करत आहे.या उपोषणाला गणोरे पंचक्रोशीतील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबिका माता पायी दिंडीतील वारकऱ्यांनी देखील शेतकरीच आहे. वारकऱ्यांनी भेट देऊन आम्ही पांडुरंगाच्या चरणी दुध उत्पादकांच्या समस्या सुटण्यासाठी प्राथणा करणार असल्याचे सांगितले.
उपोषण स्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे, सोमनाथ आहेर, पोपट आहेर, विवेक आंबरे, अंबादास दातीर, गोपाल दुध संस्थेचे अध्यक्ष अनिल आंबरे, संतोष उगले, गणोरेचे उपसरपंच प्रदिप भालेरावसुनिल उगले, डोंगरगांव चे सरपंच दशरथ उगले, उपसरपंच अमोल उगले, माजी सरपंच बाबासाहेब उगले, माजी उपसरपंच अशोक उगले, नाना नाईकवाडी, अमोल ठुबे, गोरख कदम,सोमनाथ बोंबले, संदिप रमेश वाकचौरे, मनसे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, तुकाराम गोर्डे, बाळासाहेब वाकचौरे, गणेश गोर्डे.रंगनाथ गोर्डे आदी उउपस्थित होते.
