पुन्य वार्ता
अकोले- प्राथमिक शाळेतील शिक्षणातुनच आपल्या जीवनाची दशा आणि दिशा ठरवली जाते. शाळेतील शिक्षक आपल्या जीवनाला आकार देत असतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेले विद्यार्थीच मोठ मोठे आयएएस अधिकारी होत असतात.
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात प्राथमिक शिक्षकांचा मोठा वाटा असतो. प्राथमिक शाळेत शिकत असताना झालेली मैत्री ही कृष्ण सुदाम्या सारखी असते. ती निस्वार्थी असते. या मैत्री मध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नसतो. आपल्या जीवनाचा पाया मराठी माध्यमाच्या शाळेतच मजबूत होत असतो. आपण शिक्षण घेत असलेल्या प्राथमिक शाळेला व गुरुजींना कधीही विसरू नका. जीवनात आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या शाळेला व शिक्षकांना विसरू नका. आपण कमावलेल्या पैशातून शाळेला मदत करा असे आवाहन डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले.
डोंगरगाव (ता.अकोले) येथील सरोदे वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना रंगीत ड्रेस चे वितरण करण्यात आले.वीरगांव येथील एकनाथ धोंडीबा अस्वले व लहानबाई एकनाथ अस्वले या अस्वले दांपत्याच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला होता. या निमित्ताने सुपुत्र महिंद्रा कंपनीचे अधिकारी सोमनाथ अस्वले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रंगीत पोशाखाचे ( कपडे ) वितरण करण्याचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता म्हणून आज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना रंगीत पोशाखांचे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ आरोटे बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण मांलुजकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक, शंकुतला गोर्डे, मनिषा उगले, प्रगतशील शेतकरी शिवाजी मामा नाईकवाडी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, उपाध्यक्ष जगन्नाथ आहेर,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सरोदे,गणेश दातिर,तुषार प वाकचौरे,भानुदास दातिर् रामदास आंबरे,मच्छिंद्र बिडवे,निवृत्ती एकनाथ काळे,प्रवीण मालुंजकर,वनिता सरोदे, रेशमा अंबरे ,रुपाली आहेर,आरती उगले,.सुजाता संतोष सरोदे, मनिषा काळे,प्राजक्ता उगले यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
____________________________

फोटो
डोंगरगाव -(सरोदे वस्ती) डोंगरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेसचे वाटप करताना
