पुण्यवार्ता
-वीरगाव(ज्ञानेश्वर खुळे)--
अकोले तालुक्यातील वीरगाव येथील सौ.धनश्री भाऊसाहेब तोरकड(वय45वर्षे) यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांचे पश्चात पती,मुलगा,मुलगी,वडील,दोन भाऊ,बहिण,दीर,सासू,नणंद,भाचे,पुतणे असा मोठा परिवार आहे.सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब तोरकड सर यांच्या त्या पत्नी होत.अविरत कष्टातून त्यांनी उत्तम शेती फुलविली.शेतीत फळबाग लागवड करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार होता.वीरगाव येथे झालेल्या त्यांचे अंत्ययात्रेला राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसहित मोठा जनसमुदाय उपस्थित होता.