पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)-दूध उत्पादक सभासदांना आपण सातत्याने चांगला दूध भाव फरक देत आलो आहोत,सभासदांनी नेहमीच ज्याप्रमाणे विश्वास ठेवला त्याच विश्वासाने आपण दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचे प्रतिपादन अमृतसागर दूध संघाचे चेअरमन व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोले महाविद्यालयाच्या के.बी.दादा सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.त्यावेळी चेअरमन माजी आमदार वैभवराव पिचड बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, जेष्ठ नेते गिरजाजी जाधव, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, भाजप तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, ज्येष्ठ नेते दादापाटील वाकचौरे, बाळासाहेब सावंत,संदीपराव शेटे,सयाजीराव पोखरकर,पुंजा पा आवारी, संपतराव कानवडे,रमेश शिरकांडे,विलास शेवाळे, रवी हांडे धोंडीभाऊ चव्हाण, सोपान मांडे, पंढरीनाथ बेनके,अरुण शेळके, राहुल देशमुख, सचिन जोशी, मच्छीन्द्र मंडलिक,रोहिदास वैद्य, राम तळेकर,रोहिदास कुमकर, राधाकीसन कोटकर,
दूध संघाचे संचालक रामदास आंबरे, जगन देशमुख,
गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबुराव बेनके, दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंढे,सौ. अश्विनी धुमाळ,सौ. सुलोचना औटी,आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन वैभवराव पिचड म्हणाले की, दूध संघा मार्फत जास्तीत जास्त दुग्ध जन्य
उपपदार्थ निर्मिती करण्यासाठी , अद्ययावत इमारत उभारणीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत.
४० ते ५० लाखाचा तोटा दूध संघाने सहन करून ५ रूपये अनुदान दूध उत्पादकांना अदा केले आहे.आज मितीस दूध संघाने १२५ कोटी रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल केलेली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५० लाख लिटर दूध संकलनात वाढ झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी गणेश पापळ,लक्ष्मण वैद्य,
भानुदास डोंगरे, कैलास देशमुख,
कैलास जाधव, योगेश पोखरकर,सयाजीराव पोखरकर आदींनी विविध सूचना केल्या त्यास चेअरमन, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी २०२३-२४ मध्ये सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, दूध उत्पादक, आदिवासी संस्था आणि आदिवासी दूध उत्पादक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय सूचना संचालक गोरक्ष मालुंजकर यांनी मांडली त्यास ज्येष्ठ संचालक आनंदराव वाकचौरे यांनी अनुमोदन दिले. श्रद्धांजली ठराव संचालक शरदराव चौधरी यांनी मांडला. ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब आवारी यांनी ब्राम्हणवाडा येथील शीतकरण केंद्राची जागा कायमस्वरूपी कब्जा हक्काने मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या
अभिनंदनाचा व आभाराचा ठराव यांनी मांडला.त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.यावेळी भंडारदरा धरनास वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानण्यात आले.तसेच दूध उत्पादकांना ५ रूपये प्रति लिटर अनुदान व खरेदी दर किमान ३० रूपये प्रमाणे जाहीर केल्याबद्दल चेअरमन,व्हा. चेअरमन व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.तसेच ऑलंपिक स्पर्धेत विजेत्या झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी करून अहवालवाचन
केले. आभार संचालक अरुण गायकर यांनी मानले.


