पुण्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
जगन्नाथ आहेर
.अनिल गोर्डे युथ फाऊंडेशन व आई संटुआई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर,खेळ रंगला पैंठणींचा हा कार्यक्रम फिल्म कलाकार राजेंद्र शिंदे पुणेकर यांच्या अधिपत्याखाली हजारो महिलांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
खेळ रंगला पैंठणींचा या कार्यक्रमात लहान लहान मुलींपासून तरुण तरुणींबरोबरच आजीबाईंनी देखील सहभाग नोंदविला.या खेळांमध्ये तब्बल दोनशेहून अधिक महिलांनी भाग घेत या मनमोहक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमात पैठणीसाठी प्रथम विजेत्या सोनाली घोटेकर, द्वितीय विजेत्या प्रतिक्षा पवार, तृतीय विजेत्या नीलम गोर्डे या महिला भाग्यवान ठरल्या. तसेच तन्वी हासे,सुनिता वाकचौरे,प्राची गोर्डे, शोभा गोर्डे,योगिता तोरमल या पाच महिला विजेत्यांना चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले.असे एकूण आठ बक्षीसे देण्यात आली तसेच सहभाग घेतलेल्या सर्वच महिलांना देखील मंडळाच्या वतीने विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच पुरुषांसाठी गावचा पोलीस पाटील कोण होणार ही स्पर्धा राबविण्यात आली.या चुरशीच्या लढतीमध्ये दौलत धोंडीबा महाले हे या कार्यक्रमाचे पोलीस पाटील ठरले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ अनिल गोर्डे युथ फाऊंडेशन तसेच आई संटुआई प्रतिष्ठानचे सदस्य तसेच अध्यक्षांसमवेत पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
